लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामसेवकाने फोनवर बोलण्यास टाळले, त्याचा राग येऊन ग्रामस्थाने ग्रामसेवकास धमकी देत बँक पासबूक जबरीने घेतल्याची घटना पिंगाणे, ता.शहादा येथे २२ रोजी घडली. याप्रकरणी शहादा पोलिसात शासकीय कामाता अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रकांत जाधव पाटील, रा.पिंगाणे असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, चंद्रकांत पाटील यांनी ग्रामसेवक दिनेश गुलाबसिंग पावरा यांना फोन केला होता. तो त्यांनी उचलला नाही. याचा राग येऊन पावरा हे २२ रोजी ग्रामपंचायतीत बसलेले असतांना तेथे येऊन चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. गावातील काम ज्या बँकेत करतात त्याचे पासबूक व स्टेटमेंट व प्रोसेडिंगची मागणी केली. ती देण्यास पावरा यांनी नकार दिल्यावर पासबूक जबरीने घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत दिनेश पावरा यांनी फिर्याद दिल्याने चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार भगवान कोळी करीत आहे.
पिंगाणे येथे ग्रामसेवकास एकाची दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:00 IST