निवेदनात पुढे नमूद केले आहे की, गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाच्या कारणाने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. जेमतेम आता कुठे रोजगार सुरू होत आहेत, त्यातच पाल्याच्या बँक खात्यासाठी एवढी रोख रक्कम गरिबांनी आणायची कुठून? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यातच शासन - प्रशासन सामाजिक अंतर ठेवण्यासाठी सांगत असताना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली असल्याने बॅंकेत पालक प्रचंड गर्दी करत आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेता आणि पालकांची आर्थिक परिस्थिती बघता, आपण बँकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते शून्य बॅलन्सवर सुरू करावे, असा आदेश बॅंकांना द्यावा तसेच खाते उघडण्यासाठी वेळमर्यादा १० जुलैपर्यंत शाळांना वाढवून द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
पोषण आहाराच्या पैशासाठी बॅंक खाते उघडण्यास फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST