शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार नगरपालिका, धडगाव नगर पंचायत आणि व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार नगरपालिका, धडगाव नगर पंचायत आणि व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावरून सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व डिझेलचे वितरण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे़ परंतू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीलचा गैरफायदा घेऊन काही नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी व इतर वाहनांमधून फिरत असतात. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलचे वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे़ शासनाने निर्धारित केलेल्या शहरी भागात पेट्रोलपंप धारकांनी केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. अत्यावश्यक सेवा पुरवणाºया वाहनांसाठी तसे पासेस नगरपालिका मुख्याधिकारी व ग्रामपंचायत अक्कलकुवा ग्रामसेवक यांनी देण्याचे आदेश आहेत़ नागरिकांनी किराणा, दूध, भाजीपाला व औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी वाहनाचा वापर करू नये. अशावेळी शक्यतो जवळच्या ठिकाणावरून वस्तू खरेदी कराव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे़ नागरिकांना त्यांच्या घराजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत वॉड व कॉलनीनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाºया पेट्रोल पंप धारकांवर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़