शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल, सिलिंडर झाले महाग; घरोघरी खर्चकपात करणे पडतेय भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST

नंदुरबार शहरातील पेट्रोल व डिझेलचा सेस रद्द करण्यात आला आहे. यामुळे गेल्या वर्षापासून शहरात एक रुपया स्वस्त डिझेल मिळत ...

नंदुरबार शहरातील पेट्रोल व डिझेलचा सेस रद्द करण्यात आला आहे. यामुळे गेल्या वर्षापासून शहरात एक रुपया स्वस्त डिझेल मिळत होते. परंतु केंद्र सरकारकडून दरवाढीवर अंकुश ठेवता आल्याने दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढून पेट्रोल ९४.४९, तर डिझेलचे दर हे ८३.५९ रुपये प्रतिलिटर एवढे झाले आहेत. यातून सामान्य मध्यमवर्गीयांचे हाल होत असून महिन्याचे बजेट कोलमडले असल्याचे दिसून आले आहे. याबाबत काहींकडून प्रतिक्रिया घेतल्या असता, त्यांच्याकडून दरवाढीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वांनाच फटका बसतो आहे. वाहनाचा वापर मर्यादित करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पेट्रोल व सिलिंडरचे दर वाढल्याने मासिक खर्च जुळवणे कठीण आहे. एलपीजी सिलिंडरचेही दर वाढत असल्याने चिंता वाढत आहेत.

-कैलास पाटील, नंदुरबार,

अनेक वस्तू महागल्या आहेत. यातून कमी पगार असलेल्या अनेकांना फटका बसला आहे. महिन्याचा खर्च कसा भागवावा असा प्रश्न समोर उभा राहतो आहे. महागाई कमी झाली पाहिजे. दरवाढ कायम राहिली तर पुढे खूप समस्या येतील.

- प्रशांत पाटील,नंदुरबार,

घरगुती सिलिंडरचे दर वाढल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मर्यादित वापर शक्य नाही. जेवढे गरजेचे आहे तेवढा वापर तर करावाच लागेल. हे दर कमी झाले पाहिजेत. गृहिणींचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडत आहे. महिनाअखेरीस पैसे शिल्लकही राहत नाहीत.

- छाया माळी, नंदुरबार.