शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणा_यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:40 IST

तळोदा : पालिका प्रशासनाकडून व्यावसायिकांनाही तंबी

तळोदा : सुचना देऊनही वारंवार रस्त्यावर कचरा टाकणा:या व्यावसायिक तसेच लॉरीधारकांना पालिका प्रशासनाकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची तंबी देण्यात आली आह़े पालिका अधिका:यांकडून प्रत्यक्ष व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर जावून संबंधितांना समज देण्यात आली आह़ेदरम्यान, सुंदर व स्वच्छ शहर राखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आह़े रस्त्यावर कचरा फेकल्याबाबत पालिकेने ठोस कार्यवाही सुरु केल्याने शहरवासीयांनी समाधान व्यकत केले आह़े शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आह़े त्यामुळे पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाडय़ा खरेदी करुन या गाडय़ांव्दारे दररोज कचरा संकलन केले जात असत़े त्याच बरोबर ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेटय़ादेखील वाटप करण्यात आल्या आहेत़ या शिवाय गटारींची स्वच्छताही केली जात आह़े असे असतांनाही शहरातील व्यावसायिक नेहमी सायंकाळच्या सुमारास आपली प्रतिष्ठाने बंद केल्यानंतर कचरा रस्त्यावर फेकत असतात़ त्यातही भाजीपाला व्यावसायिक उरलेला सडका भाजीपाला रस्त्यावर फेकतात़ त्यामुळे साहजिकच अस्वच्छतेत भर पडत असत़े वास्तविक या व्यावसायिकांना असा कचरा आणि भाजीपाला रस्त्यावर फेकल्याबाबत वारंवार पालिकेच्या स्वच्छता विभागाने सूचना दिल्या आहेत़ असे असताना पालिकेच्या या सूचनांना धाब्यावर बसवत हे व्यावसायिक सर्व कचरा रस्त्यावर फेकत असतात़ त्यामुळे पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, अनुप उदासी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, स्वच्छता विभागाचे प्रमुख राजेंद्र माळी, यांनी बुधवारी सायंकाळी शहरातील मेनरोड, स्मारक चौक, भाजीपाला मार्केट, बसस्थानक रोड, तहसील रोड अशा संपूर्ण परिसरातील व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटून रस्त्यावर कचरा न टाकण्याची तंबी दिली़ विशेषत: भाजीपाला व्यावसायिकांवर अधिक जोर दिला़ घंटागाडीत कचरा न टाकल्याने शहर स्वच्छ ठेवण्यास बाधा येत असत़े स्वच्छता राखण्याची सर्वाची जबाबदारी आह़े सूचनांचे पालन न केल्यास एक हजारांपासून ते पाच हजारांर्पयत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े या वेळी त्यांनी स्वच्छालये, गटारी, स्वच्छतागृह, यांचीही पाहणी          केली़दरम्यान रस्त्यावर बसणा:या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबतही पालिकेने अशीच कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आह़े