शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नवलपूर शिवारात पपईचे 700 झाडे कापून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:19 IST

शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईच्या शेतातील 700 पपईची झाडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वारंवार घडणा:या घटनामुळे शेतक:यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.याबाबत असे की, ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथील शेतकरी मुरलीधर गोविंद पाटील यांचे नवलपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली आहे. ...

शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईच्या शेतातील 700 पपईची झाडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वारंवार घडणा:या घटनामुळे शेतक:यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.याबाबत असे की, ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथील शेतकरी मुरलीधर गोविंद पाटील यांचे नवलपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली आहे. दोन ते तीन महिन्याचे पपईचे पीक झाले असून या झाडांची उंची तीन ते चार फूटावर गेली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुनील मुरलीधर पाटील हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतातील पपईचे एक एकर क्षेत्रामधील सुमारे 700 झाडे कापलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी कापलेली झाडे पाहताच धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतक:यांना बोलावले. यात संबधित शेतक:यांचे सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.एकीकडे शेतकरी नैसर्गिक लहरीपणाचा बळी ठरत असताना हाती येणारे पीक देखील माथेफिरूंच्या अशा कृत्यांमुळे शेतक:यांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या वर्षा पासून माथेफिरूंकडून मोठय़ा प्रमाणावर परिसरातील शेतक:यांची पपई व केळीची झाडे कापून नुकसान केल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुलवाडे येथील दिलीप बन्सी पाटील यांच्या शेतातील उभे पपईची झाडे कापण्याची घटना घडली होती. तर लगेच पंधरा दिवसात दुसरी घटना घडल्यामुळे परिसरात शेतक:यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसा पूर्वी अज्ञान चोरटय़ांकडून गिरीधर श्रीपत पाटील यांच्या शेतातील सबमर्सिबल मोटाराची 700 फूट केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली होती अशा वारंवार घडत असलेल्या घटनांचा तपास पोलीस प्रशासनाकडून लागत नसल्याने पोलीस यंत्रणेवर शेतक:यानी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.