शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

लोकसहभागामुळे पाचोराबारीला मिळाले गतवैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 11:25 IST

पाचोराबारी दुर्घटना : दोन वर्षानंतरही जुन्या आठवणींनी अंगावर उभा राहतो काटा

संतोष सूर्यवंशी ।नंदुरबार : गेल्या दोन वर्षापूर्वी नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथे झालेल्या अतिवृष्टीने माजलेल्या हाहाकाराला बुधवारी दोन वर्ष पूर्ण होताहेत़ अवघ्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले होत़े 396 मि़मी पडलेल्या पावसाने सर्वच उद्ध्वस्त झाले होत़े गावाला पुन्हा पूर्व पदावर आणणे प्रशासन व स्वता ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाने दाखविलेल्या आत्मविश्वासामुळेच पाचोराबारीचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्याचे अनुभव येथील पीडितांकडून कथन केले जाताय़11 जुलै 2016 ची मध्यरात्र आठवली की पाचोराबारीकरांचा अजूनही अंगाचा थरकाप उडतो़ मुसळधार पाऊसाला सोबत सुसाट वा:याची जोड़ यामुळे मध्यरात्री एकाच्याही डोळ्याला डोळा लागला  नाही़ तब्बल दोन तासात 396 मि़मी़ इतका प्रचंड पाऊस झाल्याने अनेकांची घरे, पशुधन, शेती साहित्ये, संसार यात वाहून गेला़ उद्याचा सूर्याेदय बघण्यास मिळतोय की नाही? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती़ परंतु शेवटी ज्याची भिती होती तेच झाल़े दोन तासांच्या मुसळधार पावसाने येथील ग्रामस्थांचे स्वप्नच जणू वाहून नेल़े पाचोराबारी गाव एका रात्रीच केवळ एक सपाट मैदान म्हणून उरले होत़े घटना इतकी गंभीर होती की, पाचोराबारीला भेट द्यायला येणा:या प्रत्येक जणाला विश्वासच होईना, की येथे एकेकाळी गाव वसलेले होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाच्या मनात असलेल्या आत्मविश्वासामुळे अवघ्या आठ ते नऊ महिन्यात येथील 141 पीडितांचे पुर्नवसन करण्यात आल़े यासाठी प्रशासनाकडूनही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल़ेनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान ही महाराष्ट्राला नवीन बाब नाही़ मात्र त्या नुकसानीतून सावरुन पूर्वपदावर येण्यासाठी मात्र अनेक गावे आजही वर्षानुवर्षापासून संघर्ष करीत आहेत़ पण पाचोराबारी त्याला अपवाद ठरले आह़े अतिवृष्टीत अख्खी वसाहत वाहून गेल्यानंतर या अतिवृष्टीत जी जिवीत हाणी झाली ती भरुन काढणे कठीण होत़े परंतु घरांचे जे नुकसान झाले, त्याला नवे रुप अवघ्या सहा-आठ महिन्यात देण्यात प्रशासनाला यश आल़े प्रशासन आणि लोकसहभागातून आपत्तीला सामोरे कसे जावे याचे महाराष्ट्रातील आदर्श उदाहरण पाचोराबारी ठरल़े अर्थातच त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांचे परिश्रम, प्रयत्न आणि संयोजन वाखाणण्याजोगे आह़े म्हणूनच बाधितांनी गावालाच कलशेट्टी नगर असे नाव दिले आह़े पाचोराबारी ता़ नंदुरबार येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होत़े त्यामुळे गावातील  पीडितांचे पुन्हा पुर्नवसन करणे एक मोठे आव्हान होत़े  परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने व मेहनतीने ते प्रशासनाला शक्य झाल़ेशुन्यातून पुन्हा विश्व निर्माण करायचे होत़े गावातील 141 कुटुंबियांचे पुन्हा नव्याने पुर्नवसन करण्यात आल़े मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली़ सर्वाना नव्याने घरे उभारुन झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली़ गावातील ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे प्रशासनाला बळ मिळाल़े तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिका:यांकडून रात्रन्दिवस मेहनत घेण्यात आली़ गावातील रस्ते, इमारती, शाळा आदींची पुन्हा नव्याने निर्मिती करण्यात आली़ आपण स्वतादेखील महिन्यातून दोन वेळा पाचोराबारीला भेट देऊन होत असलेल्या कामाचा पाठपुरावा केला़ अखेरीस पाचोराबारीला                   पुन्हा गतवैभव मिळवून दिल़े           पुर्नवसन कार्यात ग्रामस्थ, विविध संघटना आदींचे मोलाचे सहकार्य मिळाल़े