शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

धावती रेल्वे पकडतांना हात सटकल्याने प्रवासी कापला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:36 IST

नंदुरबार स्थानक : रुग्णवाहिकेअभावी दोन तास मृतदेह पडून

नंदुरबार : धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा हात सटकून रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली़ याबाबत नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अज्ञात म्हणून नोंद करण्यात आली असली तरी, संबंधिताकडे पद्मशाली शंकर या नावाचे आधारकार्ड मिळाले आहे़ त्यामुळे मृत्यू झालेला व्यक्ती हा तोच असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे़ मृताकडे असलेल्या दस्ताऐवजावरुन त्याच्या नातेवाईकांना सूरत येथे फोन करण्यात आला असून मृताची बहिण मृतदेह ओळखण्यासाठी नंदुरबारात रात्री उशिरा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, नावावरुन मृत व्यक्ती दाक्षिणात्य असून कामानिमित्त सूरत येथे स्थायिक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे़ आधार कार्डवरदेखील गोविंद नगर, लिंबायत, सूरत़ असा पत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे़मृतदेह झाला चेंदामेंदाप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली आल्याने संपूर्णपणे चेंदामेंदा झालेला होता़रेल्वेच्या चाकात मृतदेह अडकल्याने रेल्वेला रिव्हर्स घेऊन अस्ताव्यस्त पसरलेला मृतदेह व अवशेष लोहमार्ग पोलिसांकडून बाहेर काढण्यात आला होता़ दरम्यान, मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती़ परंतु प्रत्यक्षात दोन तासानंतर रुग्णावाहिका आल्याने संबंधित मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून होता़दरम्यान, एपीआय चिंतामन आहेर, पीएसआय माधव जिव्हारे, एएसआय गोविंद काळे, हवालदार आऱआऱ पाटील, शुभम देशमुख आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला होता़ उपस्थित सर्वच प्रवासी मृतदेहाचा फोटो तसेच व्हिडीओ काढण्यात मग्न होते़ परंतु कुणीही मृतदेह बाहेर काढण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली नसल्याचे सांगण्यात आले़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्त ही रेल्वे बराच वेळ नंदुरबार स्थानकावर थांबत असल्याने जेवन करीत होती़ कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक रेल्वे सुरु झाल्याने हातातच जेवनाचे ताट घेऊन धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे़ जर रेल्वे सुरु होत असल्याची पूर्व सूचना मिळाली असती तर कदाचीत हा अपघात टाळता आला असता अशी माहिती आता समोर येत आहे़