शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची धोकेदायक वाहतुक करण्यात येते. अशा वाहतुकीवर तळोदा पोलीसांमार्फत बंदी करण्यात आली आहे. पुन्हा अशी वाहतुक              होऊ नये म्हणून या मार्गावर प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक जिपगाडय़ांच्या कॅरीही काढण्यात आल्या आहे.तळोदा ते धडगाव हा मार्ग वळणदार असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक धोक्याचा मार्ग  असल्याचे सांगण्यात येते. तिव्र चढ-उतार, अरुंद त्याशिवाय अगदी गोलाकार स्वरुपाचे वळणे या  मार्गावर आहेत. त्यामुळे हा   रस्ता बहुतांश वाहतुकीला अवघड ठरत असून धोक्याचा  देखील आहे. त्यामुळे या मार्गावर  मोठी वाहतुक सुरूच करण्यात आली नाही. रस्त्याच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मोठय़ा बसेस  देखील जाऊ शकत नसल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बससेवा सरू करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीत हा मार्ग अधिकच खराब झाल्याने ही बससेवा देखील बंद करण्यात आली     आहे. ही वाहतुक करतांना प्रवाशांना वाहनाच्या टपावरील कॅरीचा आधार दिला जातो. कॅरीच्या आधारे वाहनात जेवढे प्रवासी बसतात, त्याहीपेक्षा अधिक        प्रवासी टपावर बसविले जात  होते. त्याशिवाय जिपगाडय़ांच्या  तिन्ही बाजूला देखील प्रवासी  उभे करीत वाहतुक करण्यात येत होती. साध्या प्रवासालाच  धोक्याचा ठरत असतानाच या  मार्गाने बहुतांश जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची वाहतुक  करण्यात येत होती. ही वाहतुक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत  असल्याने कधीही मोठय़ा अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली. संभाव्य धोके तथा अपघात टाळत प्रवाशांना  सुरक्षीत प्रवास करता यावा,  यासाठी तळोदा पोलीसांमार्फत या जीवघेण्यात प्रवासी वाहतुकीवर  काही अंशी नियंत्रण आणले आहे. काही वर्षापासून टपावरुन प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक वाहनांच्या कॅरी काढण्याचे  निर्देश तळोदा पोलीसांमार्फत  देण्यात ओ होते. पोलीसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत सर्वच वाहनधारकांनी देखील आपापल्या वाहनावरील कॅरी   काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली जीवघेणी वाहतुक सुखरुप झाल्याचे म्हटले जात आहे. जनहितासाठी पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ प्रवाशांमधूनच नव्हे तर खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडूनही कौतुक   करण्यात येत आहे. 

कॅरीचा आधार देत प्रवाशांना टपावर बसवून त्यांची वाहतुक करणे वाहनधारकांच्या आर्थिक उन्नतीचे होतेच, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अत्यंत धोक्याची होती. वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असले तरी जीवीत हानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जनहिताचा ठरतो. टपावरुन होणारी वाहतुक थांबविण्यासाठी कॅरी काढण्यात आल्याने प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तळोदा ते धडगाव या मार्गावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांकडे मोठा सामान असतो. हा सामान वाहनात ठेवल्यास प्रवाशांना बसण्यास अडचण येते. त्यामुळे सामान वाहनाच्या टपावर ठेवणेच अधिक योग्य ठरते. परंतु प्रत्येक वाहनाच्या कॅरीच काढल्यामुळे प्रवाशांना सामान ठेवण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.