शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रांवर अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी मिळून एकुण जवळपास अडीच लाख क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी झाली आहे. यापेक्षा अधीक कापूस खेडा खरेदीअंतर्गत विक्री झाला आहे. यंदा भावही बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, शहादा येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. तर नंदुरबारच्या केंद्रात खरेदी कायम आहे.जिल्ह्यात यंदा जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापसाची स्थितीही चांगली होती. परंतु जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे आणि उरलासुरला कापूस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील बेमोसमी पावसामुळे खराब झाला. असे असले तरी नंदुरबार, शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सरासरी उत्पादकतेपेक्षा चांगला कापूस झाला. यंदा भावही सुरुवातीपासून समाधानकारक राहिल्याने शेतकºयांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.दोन ठिकाणी खरेदीकेंद्रकापूस खरेदी केंद्र यंदा दोन ठिकाणी सुरू करण्यात आले होते. नंदुरबार व शहादा येथे सीसीआय आणि खाजगी व्यापाºयांनी कापूस खरेदी केला. भाव साधारणत: ४२०० ते ५४०० पर्यंत दिला गेला. यंदा शहादा केंद्रात सर्वाधिक कापूस खरेदी झाला आहे. तब्बल एक लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस ठेवण्यास जागा नसणे आणि इतर कारणांमुळे सध्या शहाद्यातील कापूस खरेदी केंद्र तुर्तास बंद ठेवण्यात आले आहे.नंदुरबार खरेदी केंद्रात ९० हजार क्विंटलपेक्षा अधीक खरेदी झालेली आहे. सध्या या ठिकाणी खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे.खेडा खरेदीलाही प्राधान्ययंदा शेतकºयांनी खेडा खरेदीलाही प्राधान्य दिले. खाजगी व्यापारी खेडोपाडी जावून शेतकºयांकडून कापूस खरेदी करत असतात. स्थानिक ठिकाणीच कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शिवाय वाहतुकीचा खर्चही वाचत असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात. असे असले तरी सदोष मोजणी पद्धतीमुळे शेतकºयांना अर्धा ते दोन क्विंटलचा फटका सहन करावा लागत असतो. तरीही शेतकरी त्यालाच प्राधान्य देतात.याशिवाय मध्यप्रदेशातील खेतिया बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी सोमवारचा भाव ४४०० ते ५१२५ रुपये क्विंटल प्रमाणे होता. या ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहने भरून येत आहेत. दरम्यान, कापूस हंगाम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस लांबला होता. शिवाय अवकाळी पावसाचाही कहर कायम होता. त्यामुळे कापसात ओलावा जास्त राहत होता. सीसीआयने अनेक वेळा कापसातील ओल लक्षात घेता खरेदी करणे थांबविले होते. शिवाय भावही कमी दिला जात होता. त्यामुळे वेळोवेळी खरेदीदार आणि शेतकरी यांच्यातील वाद कायम राहत होता.४ओला कापूस सुकवणे आणि तो भरून पुन्हा बाजारात विक्रीस आणण्याची कसरत शेतकऱ्यांची यंदा होती. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कापूस घरात भरून ठेवला होता. त्यामुळे आता तो कापूस विक्रीसाठी बाहेर निघत असून आणखी १५ दिवस ते एक महिना कापूस खरेदी सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या भाव ४३०० ते ५३०० क्विंटल याप्रमाणे मिळत आहे.