शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदलपाडा येथील 340 युवकांचा दिंडल नृत्यात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर (सोजडान) येथे गेल्या 10 दिवसापासून गेर दिंडल नृत्याच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. होलिकात्सवात करण्यात येणा:या या गेर दिंडल नृत्यात युवक सहभागी होतात.यंदाही या प्रशिक्षणात तब्बल 340 युवकांनी सहभाग नोंदविला आहे. होलिकोत्सव साजरा करणा:या सातपुडय़ाच्या पायथ्यालगतच्या गावांमध्ये गेर दिंडलनृत्य लोकप्रिय आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर (सोजडान) येथे गेल्या 10 दिवसापासून गेर दिंडल नृत्याच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. होलिकात्सवात करण्यात येणा:या या गेर दिंडल नृत्यात युवक सहभागी होतात.यंदाही या प्रशिक्षणात तब्बल 340 युवकांनी सहभाग नोंदविला आहे. होलिकोत्सव साजरा करणा:या सातपुडय़ाच्या पायथ्यालगतच्या गावांमध्ये गेर दिंडलनृत्य लोकप्रिय आहे. या नृत्याचे कार्यक्रम होळीच्या दुस:या दिवसापासून आयोजित करण्यात येतात. धुलिवंदनाच्या दिवशी सोजडान येथे या नृत्याला सुरूवात होणार आह़े 2 मार्च रोजी परिसरातील विविध गावांत होत असलेल्या गेर नृत्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. अलिविहीर येथील लोकप्रिय गेर दिंडल 1951-52 मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती. ही परंपरा त्यांचे नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या 10 ते 15 दिवसाअगोदरपासून सुरु होणा:या गेर दिंडलच्या प्रशिक्षणात सहभागी होणा:या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीर्पयत कोणीही सहभागी होऊ शकतो.सरावसाठी येणा:यांचा धोती आणि पगडी पेहराव असतो. हातात दिंडल घेवून बासरीच्या तालावर ते गेर दिंडलच्या नऊ चालीच्या सराव करतात. सहभागी झालेल्या युवक व प्रौढवयीन पुरूषांना सोजडान येथेच तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण स्थळी होळीर्पयत मुक्काम करावा लागणार आहे. या काळात प्रशिक्षणासाठी आलेले युवक व प्रौढ आंघोळ करत नाहीत. केवळ ते स्वत:चे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. पायात चप्पल न घालणे, पाणी न ओलांडणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. सोजडान येथे होळीच्या दुस:या दिवशी एकत्र जमणारे गावाचे कारभारी, प्रमुख आपापल्या गावांचे निमंत्रण घेत गेर दिंडल नृत्य सादर करण्याचे नियोजन करतात़ त्यानुसार लोकप्रिय अशा गेर दिंडन नृत्याच्या कार्यक्रमांना सुरूवात होत असते.सोजडान येथे सुरू असलेल्या या नृत्यात प्रशिक्षण वर्गात पुजरा म्हणून प्रेमराज वर्ती, गेमु पाडवी, बासरी वादक लालसिंग पाडवी, रेसा पाडवी, मांडूल वादक म्हणून जयसिंग वळवी, नगरावादक रामसिंग नावल्या पाडवी, जवरसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गेर दिंडलचा सराव सुरू आहे. अलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग पाडवी, जगतसिंग पाडवी, प्रेमराज पाडवी हे दरवर्षी या प्रशिक्षणाचे आयोजन करतात.