शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाबाबत पालकांच्या शंकांमुळे शिक्षक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शाळांमध्ये गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाची शिक्षकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पालकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शाळांमध्ये गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाची शिक्षकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पालकांच्या विविध शंका आणि प्रश्नांचे उत्तरे देता देता नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतार्पयत 41 हजारापेक्षा अधीक विद्याथ्र्याना लसीकरण करण्यात आले आहे. कुणाही विद्याथ्र्याला या लसीचा त्रास झाला नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात मंगळवारी गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याआधी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन आणि शाळा स्तरावर त्यासाठी जनजागृती करण्यात येत होती. शाळांमध्ये पालक सभा घेवून याबाबत माहितीही देण्यात आली आहे. असे असतांनाही अनेक पालक या लसीकरणासंदर्भातत विविध प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. विशेषत: पालिका शाळा आणि ग्रामिण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक किस्से घडत आहेत. पोलिओ लसीसारखी पाजण्याची लस का दिली जात नाही असा सर्वसाधारण पहिला प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. लस टोचल्यावर बालकाला काही त्रास झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्नही शिक्षकांना अनुत्तरीत करणारा ठरत आहे. ज्या शाळांमध्ये जास्त संख्येने विद्यार्थी आहेत तेथे आरोग्य विभागाकडून पर्यायी व्यवस्था अर्थात रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांचे पथक तैणात ठेवण्यात आले आहे का? आदी बाबी उपस्थित केल्या जात आहेत. नंदुरबारात काही खाजगी प्राथमिक व अंगणवाडी  केंद्रातील बालकांना थेट कार्ड देवून पालिका रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात लसीसाठी पाठविलेजात आहे. यामुळे अनेक पालकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. शाळेतच लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. याआधी बालकांना या लसी दिल्या गेल्या असतील तरी या मोहिमेअंतर्गत लस दिली तरी ते चालणार आहे.दरम्यान, जिल्ह्यात आतार्पयत 41 हजारापेक्षा अधीक विद्याथ्र्याना लसीकरण करण्यात आले आहे. आतार्पयत एकाही विद्याथ्र्याला त्रास झालेला नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले.