शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

खराब पीक काढल्याने पंचनाम्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे हातून गेलेल्या पिकाचे नैराश्य मागे टाकून शहादा तालुक्यातील बरेच शेतकरी रब्बीच्या तयारीला ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : अवकाळी पावसामुळे हातून गेलेल्या पिकाचे नैराश्य मागे टाकून शहादा तालुक्यातील बरेच शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत़ त्यांच्या या तयारीमुळे आधीच गोंधळात सुरु असलेल्या पंचनाम्यांचा गोंधळ आणखी वाढला आह़े ब:याच शेतक:यांनी पथकांनी पंचनाम्यांना हजेरी न लावल्याने रब्बीची तयारी केल्याने पथक पंचनामे करणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़ेअवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील सारंगखेडा, कु:हावद, कौठळ, पुसनद, अनरद, कळंबू, कुकावल, कोठली, टेंभा, देऊर या गावांच्या शिवारातील शेतीचे मोठे नुकसान झाले होत़े मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि पपईसह विविध फळबागा पूर्णपणे झोपून गेल्या आहेत़ या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री रावल, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्वतंत्र दौरे करुन पाहणी केली होती़ यानंतर पंचनाम्यांना वेग येण्याची अपेक्षा होती़ परंतू तसे न घडल्याने ‘आशावादी’ असलेल्या शेतक:यांनी रब्बीसाठी शेत तयार करण्यास सुरुवात केली आह़े खराब झालेले पीक बांधावर ठेवून शेतमशागत करत शेतकरी रब्बीत भरपाई काढण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत़ त्यांच्या प्रयत्नांमुळे पंचनामे करणारे गोंधळात पडत असून यामुळे या भागात सरसकट सातबा:यांवरुन पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आह़े 

शेतशिवारातील खरीप पिकांसोबतच पेरु, बोर, पपई या फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आह़े ज्या ठिकाणी अवकाळीत फळझाडे शिल्लक राहिली त्याठिकाणी आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आह़े यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चांगली हजेरी दिली असल्याने अनेक शेतक:यांनी कर्जाऊ पैसे घेत स्वत:च्या क्षेत्रासह इतर ओळखीच्यांचे क्षेत्र भाडय़ाने घेत पेरण्या केल्या होत्या़ यासाठी उधार-ऊसनवार आणि व्याजाने पैसे घेतले होत़े आता नुकसानीमुळे हे पैसे परत करावे कसे असा, प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आह़े यातून शेतकरी कजर्बाजारी झाले आहेत़