शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात बैठक : सहा हजार वनदाव्यांची माहिती उपलब्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:51 IST

मंजूर दावेदारांना पुढील महिन्यात सातबारा

तळोदा : अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील साधारण सहा हजार वनदाव्यांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब वनअतिक्रमीत धारकांच्या बैठकीत समोर आली आहे. तथापि, जे वनदावे मंजूर करण्यात आले आहेत अशा अतिक्रमणधारकांना पुढील महिन्यात सातबारा उतारा देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिका:यांनी दिले. तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील प्रलंबीत वनदाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अतिक्रमणधारकांची बैठक शुक्रवारी येथील प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली. ही बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या उपस्थितीत              घेण्यात आली. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक एस.डी. अहिरे, तहसीलदार योगेश चंद्रे, अक्कलकुव्याचे तहसीलदार नितीन देवरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे, काथ्या वसावे, संजय महाजन, निशांत मगरे, रमेश नाईक, यशवंत ठाकरे उपस्थित होते.बैठकीत अतिक्रमणधारकांच्या वनदाव्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यात  2008 ते 2010 दरम्यान ग्रामस्थांनी पाठविलेल्या 15 हजार 417 व  तळोदा तालुक्यातील सात हजार  275 दावे मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हास्तरावर अक्कलकुवा तालुक्यातील पाच हजार 361 व तळोदा तालुक्यातील दोन हजार 412 इतके दावे प्रशासन स्तरावर मंजूर झाले आहेत. परंतु उर्वरित दाव्यांबाबत प्रशासनाकडे निश्चित आकडेवारी नाही. कारण त्याचा नेमका मेळ बसत नसल्याचे अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास सहा हजार वनदाव्यांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने वनअतिक्रमणधारकांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अशा उदासीन धोरणावर लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकत्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 10 वर्षात जिल्हा प्रशासनाकडे नेमके किती    दावे ग्रामसभांकडून मंजूर होऊन आलेत व अद्याप किती अपिलात दाखल झाले आहेत असाही सवाल  या वेळी अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला होता. ज्या सहा हजार          दाव्यांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही त्यासाठी 2 व 3 ऑगस्टर्पयत संपूर्ण माहिती अद्ययावत करून लोकसंघर्ष मोर्चाशी बैठकीत सादर करण्याचे आश्वासन या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे  यांनी दिले. त्याचबरोबर ज्या दावेदारांचे दोन पुरावे आहेत असे एक हजार 810 दावे उपविभागीय समितीकडून मंजूर करून जिल्हा समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निश्चित करण्यात आले.