शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

नंदुरबार जिल्ह्याचा सुपुत्र झाला पालघरचा खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत नंदुरबारबरोबरच नंदुरबारचा सुपुत्र असलेले राजेंद्र धेडय़ा गावीत हेदेखील पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसभा निवडणुकीत नंदुरबारबरोबरच नंदुरबारचा सुपुत्र असलेले राजेंद्र धेडय़ा गावीत हेदेखील पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने नंदुरबारला दोन खासदार मिळाले आहेत.पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत हे मूळचे उमज, ता.नंदुरबार येथील रहिवासी. व्यवसायानिमित्त ते मीरारोड (मुंबई) येथे स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांची नंदुरबार ही जन्मभूमी असल्याने याच भागातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी तरुणांचे विविध प्रश्न त्यांनी सोडविले. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांनी पुढाकार घेऊन या भागात विविध उपक्रम राबवले होते. नंदुरबारमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी            मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पालघरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्यांदा पराभूत          झाल्यानंतर दुस:यांदा ते विजयी झाले. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपदही मिळाले होते. पुढे पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यातही ते विजयी झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांची बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्याशी लढत झाली. त्यात राजेंद्र गावीत यांनी पाच लाख 80 हजार 479 मते मिळवीत विजय मिळवला. 88 हजार 883 मतांची आघाडी घेत ते विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व मित्र परिवाराने आनंदोत्सव साजरा केला.