शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजना दुरूस्ती व सुरू करण्यासाठी हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखाना पुरस्कृत तापी नदीवरील नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील 22 बंद उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एच.डी. कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिका:यांना कुलकर्णी यांनी उपसा योजनांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना वजा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखाना पुरस्कृत तापी नदीवरील नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील 22 बंद उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एच.डी. कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिका:यांना कुलकर्णी यांनी उपसा योजनांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना वजा आदेश दिले.तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए.डी. कुलकर्णी यांनी श्री दत्त सारंगखेडा व श्री रामकृष्ण कहाटूळ या पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कार्यस्थळी कामकाजाची पाहणी व माहिती घेतली. या वेळी नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे धुळे येथील  अधीक्षक अभियंता एम.एच. आमले, नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे           कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, उपअभियंता एस.जी. पाटील, शाखा अभियंता के.एम. चौधरी, सातपुडा कारखान्याचे प्रतिनिधी व उपसा सिंचन विभागाचे अभियंता विनोद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी विनोद पाटील यांच्याकडून 22 सिंचन योजनांची सुरुवातीपासून ते सद्यस्थितीर्पयतची माहिती जाणून घेतली.22 उपसा सिंचन योजनांची स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत विभागातील दुरुस्ती कामाची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून स्थापत्य विभागाअंतर्गत काही योजनांच्या कार्यस्थळी प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले आहे.               परंतु यांत्रिकी व विद्युत विभागाअंतर्गत दुरुस्तीचे कामकाजसंबंधी        आतार्पयत काहीही हालचाल              होताना दिसत नाही. तिन्ही विभागातील कामे एकमेकांना पूरक असल्याने योजनांच्या दुरुस्तीचे कामकाज वेळेवर होण्यासाठी             तिन्ही विभागातील कामकाजाचा समन्वय असणे आवश्यक आहे. शिवाय 22 योजनांची काही कामे कारखाना व्यवस्थापनाशी निगडीत असल्याने योजनांची दुरुस्ती कामे तातडीने होण्यासाठी कारखाना प्रशासन सिंचन विभागास मदत करीत आहे. या वेळी सर्व सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेतल्यानंतर मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना वजा आदेश संबंधित अधिका:यांना दिल्या.