शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

स्वत:सह वडील व मुलाला हिंमत देत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:17 IST

हिरालाल रोकडे। लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : २५ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आणि मन धास्तावले कोरोना ...

हिरालाल रोकडे।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : २५ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आणि मन धास्तावले कोरोना विषाणू आजाराने आपल्याला ग्रासले असून आता आपले भवितव्य काय याबाबत चिंता वाटली. मात्र स्वत: वैद्यकीय व्यवसायात असल्याने हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल २१ दिवस माझ्यासह माझे ६५ वर्षीय वडील व बारा वर्षाच्या मुलीवर जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केल्याने आम्ही या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर निघालो.गरीब नवाज कॉलनीतील पेशाने डॉक्टर असलेल्या इम्रान पठाण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून आपण पॉझिटिव्ह असल्याचा दूरध्वनी आल्यानंतर ते धास्तावले त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दुसºया दिवशी वडिल व मुलाचाही रिपोर्ट पॉझीटिव्ह आला.येथून त्यांची कोरोन विषाणू शी संघर्षाची कहाणी सुरू होते. एकाच वेळी वडील-मुलगी व स्वत: डॉ. पठाण हे तिघं कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तिघांना जिल्हा रुग्णालयातील विशेष आयसोलेशन कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस मन खूप बेचैन होते. आता आपले काय होणार आपल्या कुटुंबियांचे काय होणार ही चिंता सातत्याने सतावत असल्याने दोन दिवस त्रास झाला. मात्र स्वत: डॉक्टर असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात २५ बाय ५० मीटरच्या हॉलमध्ये डॉ.पठाण यांच्या कुटुंबीयांसह इतर सात कोरोना बाधित रूग्ण उपचारासाठी दाखल होते सतत २१ दिवस या साऱ्यांवर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी अहोरात्र मेहनत घेत उपचार केला.उपचार सुरू असतानाच्या दिनचैर्येबाबत डॉ. पठाण यांनी सांगितले, नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्हा सर्वांवर रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचार सुरू केले. दररोज सकाळी सात वाजता व सायंकाळी पाच वाजता नियमित औषधे देण्यात येत होती. त्याचप्रमाणे सकाळी नऊ वाजता व रात्री आठ वाजता विविध प्रकारची इंजेक्शन दिली जात होती. सकाळी सातला गोळी दिल्यानंतर रुग्णालयातर्फे नाश्ता दिला जात होता. यात चहा, अंडी, दूध, पोहे व ऊपमा यांचा समावेश होता.दुपारी व रात्री नियमानुसार जेवण दिले जात होते. दिवसभर विटामिन सी यासह मल्टिव्हिटॅमिन यांचे डोसेस सुरू होते. विविध प्रकारच्या गोळ्या दिल्या जात होत्या. पाचव्या दिवसापासून आम्हाला सर्वांना बरे वाटायला लागले व खात्री झाले की या जीवघेना संकटावर आपण मात करू शकतो.याचदरम्यान दिवसभर रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी आमचे मनोबल वाढविण्यासाठी या आजाराशी लढा देण्यासाठी सातत्याने हिम्मत देत होते. स्वत: डॉक्टर असल्याने वैद्यकीय पथकाला सहकार्य करीत माझ्या कुटुंबीयांसह इतर पेशंटची ही मदत सुरू केली. सातत्याने प्रत्येकाला हिम्मत देण्याचे काम केले, प्रत्येकाचे मनोबल वाढविले व प्रत्येक रुग्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. रुग्णालयातील डॉ.राजेश वसावे, डॉ.डी.एच. चौधरी यांच्याशी नित्यनियमाने विविध विषयांवर चर्चा करून औषधोपचार सुरू ठेवला. नर्सेस, सफाई कर्मचारी, जेवणाचा डबा आणून देणारे मेस बॉय यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या कर्मचाºयांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण झाला व याची परिणीती तब्बल २१ दिवसानंतर माझे स्वत:चे कुटुंबातील व उर्वरित रुग्णांचे २ अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही कोरोना विषाणू वर मात केली असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आणि या दिव्यातून आपण बाहेर पडल्याची खात्री झाली.

माझे नागरिकांना आवाहन आहे की कोरोना विषाणू हा जीवघेणा आजार आहे. कोणत्याही नागरिकाला सर्दी खोकला ताप अशी लक्षण आढळून आल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधावा. आपल्याला असलेला आजार लपवू नये या आजारावर उपचार शक्य आहे. फक्त प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे डॉ.पठाण यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर अत्यंत चांगले उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत नकारात्मक विचार मनात आणू नये. प्रत्येक नागरिकाने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.