लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात 2018-19 या वर्षात तब्बल साडेचार लाख नागरिक पाणीटंचाईचे बळी ठरले आहेत़ एकूण 240 गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून उपाययोजा सुरु असल्या तरीही अद्याप 93 गावे टंचाईच्या तीव्र झळा सोसत आहेत़ गेल्या वर्षापासून आजवर टंचाई निवारणासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा खर्च झाला आह़े 2018 च्या पावसाळ्यात केवळ 67 टक्के पावसाची नोंद झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात चार तालुके भिषण दुष्काळी म्हणून आधीच घोषित होत़े डिसेंबर 2018 मध्ये अंतीम पैसेवारी घोषित झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हा दुष्काळी जाहिर केला होता़ या पाश्र्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखडय़ात ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या दरम्यान 240 गावे आणि 240 पाडय़ांवर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू ह्या उपाययोजना दीर्घकालीन नसल्याने अद्यापही त्या-त्या गावांमध्ये टंचाई कायम आह़े यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 97 हजार 934, नवापुर 24 हजार 646, शहादा 1 लाख 64 हजार 924, तळोदा 32 हजार 678, अक्कलकुवा 27 हजार 66 आणि धडगाव तालुक्यातील 23 हजार 544 नागरिक ऑक्टोबर 2018 पासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या झळा आजही सोसत आहेत़ प्रशासनाने मार्च महिन्यापासून केलेल्या उपाययोजनांतर्गत अधिग्रहीत विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून आटण्यास सुरुवात झाल्याने पाऊस लांबल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े
नंदुरबार तालुक्यात 109 गावे आणि 4 पाडे, नवापुर 19 गावे 6 पाडे, शहादा 80 गावे आणि 35 पाडे, तळोदा 25 गावे व 5 पाडे, अक्कलकुवा 5 गावे आणि 27 पाडे तर धडगाव तालुक्यात दोन गावे आणि 137 पाडय़ांवर गेल्या वर्षापासून पाणीटंचाई आह़े यावर मात करण्यासाठी 13 विहिरी खोलीकरण, 88 खाजगी विहिरींचे अधिग्रहण, 20 ठिकाणी टँकर किंवा बैेलगाडीने पाणी, 22 ठिकाणी तात्पुरत्या पाणी योजना तर 302 ठिकाणी विंधन विहिरी आणि 19 तात्पुरत्या नळपाणी योजना करण्याचे नियोजन करण्यात आले होत़े यातील नळपाणी व तात्पुरत्या योजनांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत़ तर गेल्या महिन्यात केवळ 24 विंधनविहिरींची कामे झाल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर जिल्हा परिषदेने कारवाई करत तातडीने ठेकेदारांना नोटीस बजावत दंड भरण्यास सांगितले होत़े परंतू यानंतर मात्र नवीन ठेकेदराने केलेल्या कामाची स्थिती समजलेली नाही़ नंदुरबार 10, नवापुर 12, शहादा 88, तळोदा 26, अक्कलकुवा 31 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक 135 विंधनविहिरी मंजूर होत्या़
दरवर्षी करण्यात येणारा टंचाई निवारण कृती आराखडा हा केवळ 15 जूनर्पयत असतो़ 15 जूननंतर येणा:या कोणत्याही प्रस्तावावर कारवाई होत नाही़ यंदा पाऊस लांबल्याने आराखडा लांबेल किंवा कसे हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आह़े एप्रिल ते जून अखेरीचा टप्पा सध्या सुरु आह़े यातही 93 गावे ही टंचाईग्रस्त असल्याचे निर्धारित आह़े यात सर्वाधिक गावे 30 गावे नंदुरबार, नवापुर 3, शहादा 38, तळोदा 18, अक्ककुवा 4 गावे 27 पाडे टंचाईग्रस्त आहेत़ यातील एकूण 1 लाख 90 हजार 272 नागरिक अजूनही टंचाई भोगत आहेत़ प्रशासनाने गावे टंचाईमुक्त केल्याचा दावा केला असला तरी टंचाई कायम आह़े