शाळेत कधीही दाखल न झालेली बालके, शाळेत दाखल परंतु अनियमित उपस्थित विद्यार्थी ,प्राथमिक शिक्षण पूर्ण न करता मध्येच शाळा सोडलेली, स्थलांतरित बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक घरातील कुटुंबांना भेटी देणे, वीटभट्टी दगडखाणी, ऊसतोड कामगार वस्ती, रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानके, मोठी बांधकामे, नियमित भटकी कुटुंबे, झोपड्या फुटपाथ, बाजार आदी ठिकाणी प्रगणकांनामार्फत भेटी देण्यात येणार आहेत. राज्यभरात प्रत्येक जिल्हानिहाय पर्यवेक्षीय समिती गठीत करण्यात आल्या असून शाळाबाह्य, स्थलांतरित व अनिमित बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, शिक्षणप्रेमी व स्वयंसेवी संस्था, एनजीओ यांनी सहकार्य करण्याचे आव्हान तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, संपर्कप्रमुख रजेसिंग भिल, मन्यार अबरार, मिलिंद पाटील यांनी केले आहे.
शहादा तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST