लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मराठा आरक्षाणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करावेत, अन्यथा राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा नंदुरबारतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर राज्यात पुन्हा आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा आज आम्ही मराठा क्रांती मोचार्चेतर्फे या निवेदनाद्वारे देत आहोत. आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. राज्य सरकारने व्यवस्थित पाठपुरावा न केल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थिगिती मिळाली आहे.तामिळनाडू, तेलगंणा, आंध्रप्रदेश, राजस्थातन, आदि राज्यांची आरक्षण सुनावणी गेली अनेक वर्षांपासून प्रलबित आहे. मराठा आरक्षण बाबतीत विविज्ञ का बदलले? हा मोठा प्रश्न आहे. हा सर्व प्रकार मराठा समाजाचा विश्वासघात व फसवणूक करणारा आहे. शासनाने तात्काळ आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चा नंदुरबारचे नितीन रोहिदास जगताप, प्रकाश मुन्नालाल हराळे, मधुकर पाटील, बबलू कदमबांडे, राजेंद्र वसंत पाटील आदी उपस्थित होते.
अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:09 IST