या स्पर्धेत भारत, अमेरिका, दुबई, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, बहरीन आदी देशातील सुमारे ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी जामियाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी तर प्रमुख अतिथी म्हणून यासीन (मुख्य संशोधक सैफरसोफ्ट बंगळूर), डॉ.एस.पी. शेखावत (डीन इंजिनीअरिंग क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) नासिर मोहम्मद (मॅनेजर, टेस्ला अमेरिका), प्रा.बिलाल (बहरीन), अब्दुल वासे (मॅनेजर नासेर कॉर्प बहरीन), शहला फरहान (कॉर्डिनेटर ब्राईट स्कूल, दुबई), पेट्रोन मौलाना हुझैफा वस्तानवी, विनीत मौलाना उवेस वस्तानवी, संस्थेचे प्रतिनिधी शेख अखलाक हे असणार आहेत कार्यक्रमासाठी जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. सैयद, उपप्राचार्य डॉ.सैयद इरफान, विभाग प्रमुख सोहेल पटेल, बिलाल पटेल, मोईन शेख, मजीद शेख, मोहसीन गंगत, इब्राहीम शेख, रजिस्ट्रार सैयद इम्तियाज, ग्रंथपाल डॉ.सैयद नूर, फिजिकल डायरेक्टर जुनेद काझी, जाविद, कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कनेक्ट-२१ टेकफेस्टचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST