अक्कलकुवा तालुक्यात सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्ग विविध प्रयोग आपल्या शेतात राबवत आहेत. त्यातच आता मशरुमचे उत्पन्न घेण्याकडे सातपुड्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मशरुमचे उत्पन्न आपल्या घरातच घेता येत असल्याने, कमी जागेत जास्त उत्पन्न निघत असल्याने शेतकरी या शेतीकडे आकर्षित होत आहेत. तसेच आयुर्वेदिकदृष्टीने मशरुम शरीराला पोषक असल्याने अक्कलकुवा शहरात मशरुमची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मोलगी व अक्कलकुवा शहरात सातपुड्यात तयार झालेले मशरुम विक्रीसाठी दाखल झाले आहे.
अक्कलकुवा येथील स्टाॅलच्या उद्घाटनप्रसंगी खापरचे माजी उपसरपंच ललित जाट, माजी उपसरपंच वीरबहादूर सिंह राणा, हिरामण पाडवी, राजेश वसावे, संतोष पाडवी, कुवरसिंग पाडवी, सुनील राव, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, मगन वसावे, जी. डी. पाडवी, तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी, कृषी पर्यवेक्षक डी. पी. गावित, सहायक एल. डी. वसावे, बलवंत वसावे, भूषण वसावे, हेमंत वसावे, प्रा. रवींद्र गुरव, आदी उपस्थित होते.