शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेवकांच्या त्या प्रशिक्षण शिबिराची चौकशी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

सन २०२०-२१ अनुसूचित जमाती उपयोजना निधी अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे या योजनेचा कार्यारंभ आदेश ...

सन २०२०-२१ अनुसूचित जमाती उपयोजना निधी अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे या योजनेचा कार्यारंभ आदेश डाॅ. बाबासाहेब प्रतिष्ठान, नंदुरबार या संस्थेला मंजूर करण्यात आलेला होता. त्याप्रमाणे सदर संस्थेमार्फत नंदुरबार जिल्ह्यांतर्गत प्रकल्पनिहाय कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण दिले जात होते. त्याअंतर्गत ३० एप्रिल रोजी तळोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून प्रशिक्षणासाठी आलेल्या अंगणवाडी सेविका दोन ते तीन तास उन्हात बसून राहिल्या. संबंधित अधिकारी येथील या प्रशिक्षणाला सुरुवात केली जाईल, असे आयोजकांकडून त्यांना सांगण्यात आले. मात्र दोन वाजले तरीही प्रशिक्षण सुरू झाले नाही. प्रशिक्षणाला आलेल्या अंगणवाडी सेविकांना जेवणाला घेऊन जाण्यात आले व तेथे फक्त फोटो काढून त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले.

या सर्व प्रकाराबाबत दै लोकमतने १ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशी करणेकामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजने प्रकल्प कार्यालय नवापूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंडार व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, अक्कलकुवाचे बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश मान्टे यांची नियुक्ती केली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून ३ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावा, असे आदेश याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत तळोदा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनीं मौनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात प्रशिक्षणात झाल्याच्या दिवशीदेखील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी देखील त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर चौक शीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे.