शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.प्रवर्गात धनगर समाजाच्या समावेशाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी महासंघाने केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी महासंघाने केली आहे. तसे झाल्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध राहणार असून मोठे आंदोलन देखील उभारले जाणार असल्याचे महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर, धनगड हे दोन्ही शब्द अनुसीचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. महाराष्ट्राच्या सुचीत धनगड असे भाषांतर केले जात आहे ते धांगड असे हवे. अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर ओरॉन जमात आहे. तिची पोटजात धांगड आहे. महाराष्ट्रात ओरॉन धांगड नाही. पण सुचीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. 2005 साली विधान परिषद सभापतींनी बैठक घेतली. त्यावेळी संशोधन पथक तयार केले गेले. त्यांनीही धांगड या जातीचा उल्लेख केला आहे. इतर राज्यात या जातील अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान आहे. याचा अर्थ धांगड म्हणजे धनगर नाही असाही दावा महासंघाने दिलेल्या निवेदनात केला आहे. धनगर ही जात असून जमात नाही असे नमुद करून निवेदनात म्हटले आहे की, धनगर आदिवासी नाहीत याचे अनेक ऐतिहासिक पुरावे या निवेदनात देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची धनगर समाजाची शिफारस करू नये. कारण राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक 36 वर ओरॉन, धांगड आहे. ते धनगड किंवा धनगर नाही अन्यथा शासनाविरोधात आदिवासींचा संघर्ष मोठय़ा  प्रमाणावर उभा करण्यात येईल असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, महासचिव बटेसिंग वसावे, पावरा, बारेला मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले, आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष वाहरू सोनवणे, पावरा समाज संघटनेचे सरदार पावरा यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिका:यांच्या सह्या आहेत.