शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात केवळ तीन व्हेंटीलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात केवळ तीन व्हेंटीलेटर आहेत़ यावर दक्षता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात केवळ तीन व्हेंटीलेटर आहेत़ यावर दक्षता म्हणून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांचे व्हेंटीलेटर अधिग्रहीत केले आहेत़जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करुन कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी गेल्या महिन्याभरापूर्वीच प्रयत्न झाला होता़ यांतर्गत आजवर या कक्षात २३ जणांवर उपचार करुन त्यापैकी २२ जणांना घरी जाऊ देण्यात आले होते़ तर एका जणांवर कक्षात उपचार सुरु आहेत़ त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी दक्षता म्हणून त्यांना येथे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान दिवसेंदिवस देशात कोरोनाची भिती वाढत असताना त्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्य सामुग्रीचा आढावा प्रशासन घेत आहे़ यात प्रामुख्याने व्हेंटीलेटरचा प्रश्न ऐरणीवर आला होतो़ रुग्णाच्या शरीरात शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा फैलाव झाल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छास प्रणाली अर्थात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे़ जिल्हा रुग्णालयात अतीदक्षता विभागात यापूर्वी तीन व्हेंटीलेटर देण्यात आले होते़ हे तिन्ही व्हेंटीलेटर सध्या कोरोना विलगीकरण कक्षात देण्यात आले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने दक्षता म्हणून जिल्ह्यात व्हेंटीलेटर असलेल्या खाजगी रुग्णालयांना पत्र दिले होते़ त्यानुसार १४ व्हेंटीलेटर अधिग्रहीत आहेत़जिल्हा नियोजनकडून जिल्ह्यात व्हेंटीलेटरची संख्या वाढावी यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे़ यातून लवकरच चांगल्या दर्जाचे व्हेंटीलेटर मिळणार आहे़ जिल्हा प्रशासन व्हेंटीलेटर खरेदीसाठी आरोग्य विभागाला सातत्याने माहिती देत असून येत्या काही दिवसात तातडीची खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़एकीकडे व्हेंटीलेटरबाबत समस्या असताना दुसरीकडे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने एचआयव्ही बाधितावर उपचारावेळी वापरण्यात येणाºया पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट वाढीव मागवले आहेत़ एचआयव्ही रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार हे खासकरुन या कीटचा वापर करतात़ हेच कीट सध्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल झालेल्यांवर उपचार करतेवेळी वापरण्यात येत आहे़ जिल्हा रुग्णालयाने २०० कीट सध्या मागवून घेतले आहेत़ परंतू दर दिवशी किमान १० ते १५ जण कीटचा वापर करत असल्याने लवकरच ते संपणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शासनाकडून लवकरच वाढीव कीट देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़