शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केवळ तीन हजार शेतक:यांना मिळाला पिकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2018 च्या खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ तीन हजार शेतक:यांना शासनाने पीक विमा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 2018 च्या खरीप हंगामात अवर्षणाचा फटका बसलेल्या केवळ तीन हजार शेतक:यांना शासनाने पीक विमा मंजूर केला आह़े 10 हजार शेतकरी विम्याच्या परताव्यासाठी पात्र असतानाही केवळ तीनच हजार शेतक:यांच्या खात्यावर रक्कम आल्याने ग्रामीण भागात निराशा व्यक्त करण्यात आली़    कृषी विभागाकडून 2018 च्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली होती़ यानुसार 31 जुलै 2018 र्पयत जिल्ह्यातील 10 हजार 386 शेतक:यांनी सहभाग घेतला होता़ जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाने हजेरीच न लावल्याने शेतकरी दुष्काळाच्या खाईत ढकलले गेले होत़े यातून जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त ठरले होत़े कालांतराने उर्वरित दोन तालुकेही पैसेवारी  कमी झाल्याने दुष्काळी जाहिर करण्यात आले होत़े यामुळे पीककर्ज घेतांना बँकांकडून सक्तीने                 वसुली होणा:या विम्याच्या रकमेस शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता  होती़ कृषी विभागाने जानेवारी अखेरीस पूर्ण केलेल्या पीक कापणी  प्रयोगामुळे शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ 36  मंडळात झालेल्या दीड हजार  कापणी प्रयोगात नुकसानीचे  प्रमाण सर्वाधिक असल्याचे नमूद करत ते 70 टक्क्यांपेक्षा अधिक  असल्याचे म्हटले होत़े यामुळे विमा करणा:या सर्वच शेतक:यांना भरपाईची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात कृषी विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारी तीन हजार शेतक:यांचा समावेश झाल्याचे स्पष्ट असून या शेतक:यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वर्ग करणे सुरु असल्याची माहिती आह़े गेल्या आठवडय़ापासून मिळणारी ही  रक्कम तुटपुंजी असल्याचा दावा शेतक:यांचा असून कर्जातून कपात केलेल्या 10 टक्के रकमेच्या  तुलनेत पिकासाठी हेक्टरी देण्यात येणारा विमा हा वार्षिक उत्पादनापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आह़े 

2018 च्या खरीप हंगामात विविध बँकांकडून कर्ज घेणा:या 10 हजार 386 शेतक:यांनी पीक विमा  करण्यासाठी सहमती दिली होती़ यानुसार त्यांच्या कर्जातून पिकनिहाय रक्कम कपात करत 2 कोटी 51 लाख 20 हजार 666 रुपयांचा विमा हप्ता शासनाकडे वर्ग करण्यात आला होता़ 10 हजार शेतक:यांनी केलेल्या या पिकविम्यातून 1 लाख 33 हजार हेक्टर संरक्षित झाले होत़े अल्पपजर्न्यामुळे प्रत्येक शेतक:यास विमा मिळेल अशी अपेक्षा असताना केवळ 2 हजार 890 शेतक:यांना 5 कोटी 52 लाख 90 हजार 493 रुपयांचा परतावा मिळाला आह़े 36 पैकी केवळ 22 ते 25 मंडळात ही परताव्याची रक्कम मिळाल्याची माहिती असून मंडळनिहाय रक्कम वर्ग करण्याचे कामकाज अद्यापही संथगतीने सुरु असल्याची माहिती आह़े विमा कंपनीकडून शासनाकडे सादर झालेल्या यादीनुसार हे कामकाज केले गेले आह़े शेतक:यांना भरपाई देताना मंडळनिहाय केलेल्या पिक कापणी प्रयोगाचा अहवाल अंतिम मानला गेल्याचे सांगण्यात आले आह़े 

पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पन्नाची माहिती घेत विमा कंपन्यांनी शासनाच्या सहाय्याने परतावा देण्याची कारवाई सुरु केली आह़े जिल्ह्यात विमा मिळालेल्या शेतक:यांना त्यांच्या नुकसानीनुसार भरपाई दिली गेली आह़े शेतक:यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आह़े -डॉ़ बी़एऩपाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबाऱ