शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस टँकर उलटल्याने नवापूरात एकच धावपळ

By admin | Updated: January 18, 2017 23:34 IST

सुदैवाने गळती नाही : रात्री उशिरार्पयत टँकर काढण्याचे काम सुरू, रहदारी सुरळीत

नवापूर : घरगुती वापराचे इंधन वाहून नेणारा गॅस टँकर उलटल्याने काही काळ धावपळ उडाली होती. सुदैवाने टँकरमधून गॅस लिक न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. शहर हद्दीत रेल्वेगेटनजीक हा अपघात बुधवारी दुपारी घडला.शहरापासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. सुरतकडून नागपूरकडे भरधाव जाणारा गॅस टँकर (क्रमांक एमएच 16- एच 4256) दुपारी अचानक उलटला. टँकरमध्ये गॅस असल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही धावपळ उडाली. तातडीने अगिAशमन दलाला पाचारण करण्यात आले. तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून गॅस लिक होत नसल्याची खात्री केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सायंकाळी शिरपूर व साक्री येथून क्रेन मागविण्यात आल्यानंतर उलटलेला टँकर काढण्याचे काम सायंकाळी सुरू करण्यात आले. जवळच रेल्वे फाटक असल्यामुळे व ते वारंवार बंद होत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे टँकर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत          होती. स्थानिक पोलिसांनी वाहनांची रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी प्रय} केले. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस लिक होऊ नये व झालाच तर उपाययोजना म्हणून नवापूर पालिकेचा अगिAशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरार्पयत टँकर काढण्याचे काम सुरू होते.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघात घडला त्या ठिकाणीच सकाळी उभ्या ट्रकवर लहान चारचाकी टेम्पो ठोकला गेला. तर सावरट येथील दुचाकी स्वारांच्या वाहनालाही त्याच ठिकाणी अपघात झाला. त्यात एकजण जखमी झाला. गेल्या काही दिवसातील अपघातांचे प्रमाण पहाता हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे.         (वार्ताहर)