शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

तापी काठावर केवळ पोलिसांचाच पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदा प्रकाशा येथील तापी नदी घाटावर दशामाता मूर्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदा प्रकाशा येथील तापी नदी घाटावर दशामाता मूर्ती विसर्जनाला ग्रामपंचायतीने ठराव करून बंदी केली होती. पोलीस प्रशासनानेही प्रकाशा गावाकडे येणाऱ्या ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे बुधवारी रात्री कुणीही भाविक दशामाता मूर्ती विसर्जनासाठी येथे आले नाहीत. भाविकांनी आपापल्या गावीच विसर्जन केले. दरम्यान, येथील मंदिर परिसरात भाविकांऐवजी पोलीस बंदोबस्त दिसून आला.गेल्यावर्षी २०१९ मध्ये दशामाता मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आदी ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे यात्रेचे स्वरूप होते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथून हजारो भाविकांची वर्दळ प्रकाशा येथे होती. शेकडो मूर्तींचे विसर्जन गेल्यावर्षी हजारो भाविकांच्या साक्षीने रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले होते. मात्र यंदा २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून येथील मंदिरेही बंद आहेत. दशामाता मूर्ती विसर्जनासाठी येथे होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो म्हणून प्रकाशा ग्रामपंचायतीने मासिक सभा घेऊन यंदा प्रकाशा येथे तापी नदीपात्रात भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी येऊ नये, असा ठराव केला होता. तसेच पोलीस प्रशासनानेही ग्रामपंचायतीच्या मदतीने गावोगावी फलक लावून मूर्ती विसर्जनाला प्रकाशा येथे नये, अशी जनजागृती केली होती. सोबतच सोशल मिडियाद्वारेही आवाहन करण्यात आले होते. पोलिसांनीही प्रकाशा गावाकडे येणाºया विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने कुणीही भाविक येथे मूर्ती विसर्जनासाठी आले नाही. भाविकांनी आपापल्या गावी मूर्ती विसर्जन केले. बुधवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथे येऊन आढावा घेतला. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पोलीस अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड यांनी प्रकाशा बसथांबा, तोरडे पेट्रोल पंप, कोरीट नाका, गौतमेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. जेणेकरून विसर्जनासाठी भाविकांना नम्रपणे त्यांना परत पाठवता येईल. तापी घाटावर पट्टीचे पोहणारे गावातील १५ जणांचे पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. यासोबत ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी हेदेखील मुक्कामी थांबले होते. मंदिर ट्रस्टचे संचालक गुड्डू पाटील, सुरेश पाटील, गजानन भोई हेदेखील मदतीला होते. रात्रीचे १२ वाजले तरीही कोणी भाविक आले नाही. रात्री एक वाजता पावसाला सुरुवात होऊन सुमारे अर्धा-पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्या. स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रात्रभर सद्गुरू धर्मशाळेजवळ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक किसन पाटील हे गावाच्या मेनरोडवरून आढावा घेत होते. पहाटेपर्यंत कुणीही भाविक मूर्ती विसर्जनासाठी आले नव्हते. नंदुरबार, तळोदा, शहादा, खेडदिगर आदी ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ग्रामपंचायतीचा ठराव योग्यप्रकाशा ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मूर्ती विसर्जनाला येथील तापी नदीपात्रात येऊ नये, असा ठराव केला होता आणि तो योग्य ठरला. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यास मदत झाली एवढे मात्र नक्की. पोलीस अधिकारी व कर्मचारी व होमगार्ड आदी सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी सहा वाजेपर्यंत मंदिर परिसरात थांबून होते. रात्रभर त्यांनी जागरण केले. प्रकाशा बॅरेजचे लाईट बंद होते. तसेच केदारेश्वर मंदिरासमोरील हायमस्ट लॅम्पही गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. गौतमेश्वर मंदिरावरील हायमस्टदेखील गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने तेथे गस्त घालणारे पोलीस कर्मचारी पुलावर अंधारात बसले होते.