शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांची केवळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:36 IST

गेल्या वर्षाची कामे अपुर्ण : दुष्काळ संधी समजून कामांना प्राधान्य द्यावे

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्तची कामे थंड पडली आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असतांना नेमके जलयुक्त आहे कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. याउलट अवघ्या दोन तालुक्यांपुरते मर्यादीत असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कामांची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे. गेल्यावर्षी १८० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले, परंतु अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत तर यंदा २०६ गावांमध्ये ते राबविले जाणार आहे.चार वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ७० गावांची निवड करण्यात आली होती. आहे त्या तलावांचा गाळ काढणे, खोलीकरण करणे, सिमेंट बांध, कच्चा बांध बांधणे, रिचार्जशाप्ट, कुपनलिका पुनर्रभरण, शेततळे करणे, गॅबीयन बंधारे यासह इतर जलसंधारणाची कामे या योजनेअंतर्गत करण्यात येत होती. त्यासाठी तालुकानिहाय गावांची निवड करण्यात येते. पहिल्या वर्षी ७० तर दुसऱ्या वर्षी ७६ गावांची निवड करण्यात आली होती. नंतर या गावांची संख्या वाढत गेली. यंदाच्या वर्षाला २०६ गावांची निवड या योजनेअंतर्गत होणाºया कामांसाठी करण्यात आली आहे.सुरुवातीला प्रतिसादपहिल्या दोन वर्षी बºयापैकी प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी स्वत: मुख्यमंत्र्यांनी येवून या कामांची पहाणी केली होती. दुसºया वर्षीही चांगला प्रतिसादर राहिला. मात्र, तिसºया वर्षापासून गावांची संख्या वाढली आणि कामांचा दर्जा घसरला. गेल्या वर्षी १८० गावांची निवड करण्यात आली होती. पैकी या गावांच्या कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. त्यातच आता २०१९-२० च्या कामांना सुुरुवात होत आहे.जलयुक्त शिवार अभियानात गावे निवडतांना पहिल्या दोन वर्षात मोजकेच गावे निवडली जात होती. त्यामुळे अनेक गावांची इच्छा असूनही त्यांना या अभियानात सहभागी होता येत नव्हते.झालेल्या कामांचे आॅडीट व्हावेजलयुक्तमध्ये झालेल्या कामांचे आॅडीट करण्याची मागणी वेळोवेळी अनेक संघटनांनी केली होती. पहिल्या व दुसºया वर्षी झालेल्या कामांची स्थिती काय आहे. किती सातत्य त्यात राहिले या बाबीही पडताळून पहाणे आवश्यक ठरणार आहे. नाही तर केवळ योजना राबवयाची असे प्रकार सुरू आहे. दुसरीकडे पाणी फाऊंडेशनने नंदुरबार व शहादा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत कामांना सुरुवात केली आहे. त्यातील लोकसहभाग लक्षणीय ठरत आहे. परिणामी जलयुक्तीची कामात केवळ निधी खर्च करणे एवढेच उद्दीष्ट राहिल्याचे बोलले जात आहे.