शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 721 शेतक-यांनाच पीक विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:36 IST

17 हजार शेतकरी वा:यावर : बोंडअळीचे नुकसानही नाकारले

नंदुरबार : गेल्या खरीप हंगामात 18 हजार शेतक:यांनी पीक विमा करून घेतला होता़ यातील बहुतांश शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागल्याने त्यांना विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती़ परंतु विमा कंपन्यांनी ही अपेक्षा धुळीस मिळवली असून 18 हजारपैकी केवळ 721 शेतक:यांना पीक विमा मंजूर झाला आह़े एकीकडे शासनाकडून शेतकरी हितासाठी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर होत असताना जिल्ह्यातील शेतक:यांना विमा परतावा न दिला गेल्याने शेतकरी अवाक् झाले आहेत़ बोंडअळीसह अल्पपजर्न्यामुळे पिकांचे सातत्याने नुकसान झाल्याचे सव्रेक्षण समोर येऊनही विमा कंपन्यांनी शेतक:यांना विमा परतावा देण्यात कंजुषी केल्याचे दिसून आले आह़े शेतक:यांना कर्ज वितरण करत असतानाच विम्याच्या नावाखाली रक्कम कपात करून बँका शेतक:यांना लुबाडत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊनही विमा परतावा न मिळाल्याचा परिणाम यंदाच्या पीक विम्यावर होत असून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज उचलून विमा रक्कम कपातीच्या धोरणातून स्वत:ची सुटका करून घेत आहेत़ शासनाकडून आलेले बोंडअळी नुकसानीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने विमा परतावा मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या शेतक:यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आह़े विमा कंपन्यांकडून कमीत कमी शेतक:यांना दिलेल्या पीक विमा परताव्याचा परिणाम आता दिसून येत आह़े पीक विमा करून कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसल्याचे गृहीत धरून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज घेत आह़े हे कर्ज घेण्यामागे शासन आणि बँका यांचे अडेलतट्ट धोरणही कारणीभूत आह़े ज्वारी, बाजरी, कडधान्य, सोयाबीन, तेलबिया पिके यांना कर्जाच्या 2 टक्के पीक विमा, तर कापसासाठी कर्ज घेतल्यावर कर्जातून पाच टक्के रक्कम कापली जात़े यातून गरजा पूर्ण होत नसल्याने शेतक:यांनी हा मार्ग पत्करला आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त 85 हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरत होत़े परंतु विमा कंपनीकडून कापूस उत्पादकांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही़ बोंडअळी हे नैसर्गिक आपत्तीत मोडत असल्याने शेतक:यांना त्यानुसार हेक्टरी सात हजार किंवा उत्पादन खर्चाच्या कमीत कमी 30, तर जास्तीत जास्त 60  टक्के भरपाई देणे अपेक्षित होत़े परंतु एकाही शेतक:याचा यात समावेश करण्यात आला नाही़ कृषी विभागाने बोंडअळीवर उपाययोजना करणे शक्य असल्याने विमा कंपन्यांनी कारवाई केली नसावी असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आह़े गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 18 हजार 230 शेतक:यांना पीक विम्यात समाविष्ट करण्यात आले होत़े यातून 2 कोटी 78 लाख 97 हजार 326 रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती़ शेतक:यांच्या पीक कर्जातून ही रक्कम कपात करण्यात आली होती़ यानंतर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात जाऊन पिकांचे सव्रेक्षण करून सात वर्षाच्या सरासरीनुसार आलेले उत्पादन आणि नुकसान यांची माहिती गोळा केली होती़ यातून ब:याच शेतक:यांची पिके ही नुकसानग्रस्त झाल्याचे समोर आले होत़े एकूण 18 हजार 230 शेतक:यांच्या पिकांचे सव्रेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विमा कंपन्यांनी केवळ 721 शेतक:यांना पात्र ठरवत त्यांना 16 लाख 62 हजार रुपयांचा परतावा दिला आह़े यात एकही कापूस उत्पादक शेतकरी नाही़ विमा कंपन्यांनी उडीद, भुईमूग या उत्पादनांना विमा रक्कम दिली आह़े यात विमा रक्कम मिळालेले सर्व 721 शेतकरी शहादा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि तळोदा तालुक्यातील असल्याची माहिती आह़े  रब्बी हंगामात 347 शेतक:यांनी आठ लाख 64 हजार रुपयांचा पीक विमा केला होता़ यात काही शेतक:यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता़ या शेतक:यांची परताव्याची प्रतीक्षा कायम आह़े