शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

नंदुरबारात केवळ 50 शेतक:यांनीच केला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:07 IST

नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार असून त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही़ कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 ...

नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार असून त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही़ कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 हजार पैकी 721 शेतक:यांना पीक विमा मंजूर केला होता़ या मंजुरीमुळे बोंडअळीतून नुकसान झालेल्या शेतक:यांनी व्यक्त केलेली नाराजी यंदाच्या पीक विम्याच्या पथ्यावर पडली असून शेतकरी विमा करण्यास अनुत्सुक असल्याचे स्पष्ट होत आह़े यातून बँकांकडून कर्ज घेणा:या 11 हजार पैकी केवळ 742 कजर्दार शेतक:यांनीच  पीक विमा करण्यास सहमती दर्शवल्याचे आकडेवारीवरून समारे आले आह़े पीक विमा करणा:या शेतक:यांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे बिगर कजर्दार शेतक:यांना कॉमन सव्र्हिस सेंटर आणि आपले सरकार केंद्रातून पीक विमा करता यावा म्हणून केंद्रचालकांचे प्रशिक्षण घेतले होत़े यात 145 महाऑनलाईन आणि 150 कॉमन सव्र्हिस सेंटरचे संचालक उपस्थित होत़े यातून पीक विम्याची व्याप्ती वाढेल असे वाटत असतानाच दोन आठवडय़ात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जिल्हा बँक आणि 10 राष्ट्रीयकृत बँकांच्या शांखांमधून पीक कर्ज घेणा:या 11 हजार 571 शेतक:यांपैकी केवळ 742 शेतक:यांनी पीक विमा करून घेतला आह़े बँकांकडून विम्यापोटी 2 ते 5 टक्के रक्कम वसूल होऊ नये यासाठी शेतकरी विमा नसलेल्या पिकांचा बोजा चढवून घेत बँकांकडून कर्ज घेत आहेत़ जिल्हा बँकेने आजअखेरीस जिल्ह्यात 58 टक्के वाटप केले आह़े तर स्टेट बँकेसह 9 राष्ट्रीय बँकांच्या शाखांमधून केवळ 17 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले असल्याने विम्याची आकडेवारीही खाली आली आह़े 10 जुलै अखेर्पयत जिल्ह्यातील बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बॅँक यांच्याकडून 55 हजार 600 शेतक:यांना पीक कर्ज वाटप करून त्यांच्याकडून विमा करून घेण्याचे टार्गेट देण्यात आले होत़े या बँकांनी 10 जुलैर्पयत केवळ 4 हजार 255 शेतक:यांना 72 कोटी 27 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े जिल्ह्यात सर्वाधिक 14 हजार 950 शेतकरी सभासद संख्या असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 721 शेतक:यांना 13 कोटी 29 लाख तर त्या खालोखाल सेंट्रल बँकेने त्यांच्या 11 हजार 744 शेतकरी सभासदांपैकी 704 शेतक:यांना 12 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े  बँक ऑफ महाराष्ट्राने 508, बँक ऑफ बडोदा 644, बँक ऑफ इंडिया 92, देना बँक 376 आणि युनियन बँकेने 540 शेतक:यांनाच कजर्वाटप केल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यातील उर्वरित बँकांची आकडेवारीही याच प्रकारे आह़े राष्ट्रीयकृत बँका कागदपत्रांची  कागदपत्र आणि कजर्माफीचा बोजा चढवण्याची सक्ती करत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक:यांना पीक कर्ज वाटप करताना मागील कर्जाचा भरणा आणि कजर्माफीचे निकष लावल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े  येत्या 31 जुलैर्पयत बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना पीक विमा करून घेता येणार असल्याचे कृषी विभागाने कळवले आह़े कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भात पिकासाठी प्रति हेक्टर 27 हजार 500 रूपयांचे विमा संरक्षण आह़े यासाठी 550 रुपयांची रक्कम कर्जातून कपात होणार आह़े ज्वारी 24 हजार संरक्षण-कपात 480, बाजरी 20 हजार-कपात 400, भूईमूग 30 हजार-कपात 600, सोयाबीन 35 हजार-कपात 700, मूग आणि  उडीद 18 हजार 750-कपात 375, तूर 27 हजार 500 तर कपात 550, कापूस 35 हजार-कपात 1 हजार 750 तर मका पिकाला 26 हजार 200 रुपयांचे संरक्षण देण्यात आले असून 524 रुपयांची विमा रक्कम कर्जातून कापली जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े ही रक्कम बँकांकडून कपात करतेवेळी इतर 150 रूपयांर्पयत चाज्रेस लागत आहेत़