शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

जिल्ह्यातील 171 मंडळांन ऑनलाईन परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 171 मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 171 मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस दलाकडून परवानगी मागितली आह़े मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या या अर्जावर कामकाज सुरु असून 1 सप्टेंबर्पयत संख्येत वाढ होणार असल्याचे पोलीस दलाने म्हटले आह़े          जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांकडून उत्सवासाठी पोलीस ठाण्यांकडून देण्यात येणारी परवानगी ही एक खिडकी योजनेतून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता़ यानुसार गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्यास सुरुवात करण्यात आली आह़े यंदाही पोलीस दलाच्या सिटीझन पोर्टलवर परवानगी देण्याची कारवाई सुरु केली गेली होती़  या प्रक्रियेला मंडळांनी पहिल्या दिवसापासून मंडळांनी प्रतिसाद दिला आह़े येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी समोर येणार असून यात दीड दिवस, पाच, सात, नऊ आणि अकराव्या दिवशी विसजर्न करणा:या गणेशमंडळांची माहिती समोर येऊन त्यानुसार पोलीस बंदोबस्त, वाहतूक मार्ग व इतर बाबींचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े दरम्यान पोलीस दलाकडे परवानगी घेणा:या मंडळांना वीज वितरण कंपनीकडून जोडण्या मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े कंपनीने योग्य त्या अटी शर्तीवर जोडण्या देण्याची मागणी मंडळांची आह़े जिल्ह्यातील 171 मंडळांनी केलेल्या अर्जावर पोलीस दलाने तातडीने कारवाई करत 60 मंडळांना परवानगी दिली आह़े ही सर्वच मंडळे शहरी भागातील आहेत़ शिल्लक असलेल्या 110 मंडळांच्या अर्जावर कारवाई करण्यात येत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी मंडळांना भेटी देत आढावा घेत आहेत़ 1853 पासून शहरात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता़ शतकी परंपरा असलेल्या मानाच्या दादा व बाबा या गणपती मंडळांचीही तयारी जोरात सुरु झाली आह़े पाठ पूजनानंतर दोन्ही मंडळांकडून काळ्या मातीपासून मूर्ती साकारायला सुरुवात झाली होती़ दोन्ही मानाच्या गणपतींच्या मूत्र्या रथावर  साकारण्यात येत आहेत़ कारागिर मूर्तीना अंतिम रूप देण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आह़े गोपाळ सोनवणे,संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे,जगदिश सोनवणे हे चौघे मूर्तिकार दादा गणपतीची मूर्ती साकारत आहेत.दादा आणि बाबा गणपतीसोबत मानाच्या इतर गणपती मंडळांकडून तयारी करण्यात येत आह़े देखावे तयार करणा:या कारागीरांकडूनही अंतिम रुप देण्यात येत आह़े शहरातील पाच ते सहा मंडळांकडून स्वयंचलित प्रणालीवर देखावे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होत़े जिल्ह्यात गेल्यावर्षी 568 मंडळांनी अधिकृतपणे नोंदणी करुन गणेश मूर्तीची स्थापना केली होती़ यंदाही ही संख्या 600 च्यावर जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आह़े दर दिवशी ऑनलाईन पोर्टलवर 50 च्या जवळपास मंडळे नाव नोंदणी करत आहेत़ येत्या दोन दिवसात मूळ आकडेवारी समोर येणार आह़े या सर्व मंडळांना पोलीस ठाणे निहाय नियुक्त पोलीस अधिकारी भेट देऊन सूचना करत आहेत़ तसेच सुरक्षा उपाय व सुविधांची पाहणी करत आहेत़ मोठय़ा गणेश मंडळांच्या मूर्ती मार्गस्थ होत असताना शहरातील बाजारपेठेत घरगुती गणेश मूर्तीची दुकाने सजवली जात आहेत़ शहरातील स्टेशनरोड, स्टेट बँक परिसरासह कुंभारवाडा आणि मंगळबाजारात गणेश मूर्तीची विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत़ यंदा मूर्तीच्या किमतीत ब:यापैकी स्थिरत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आह़े विविधरंगी आकर्षक अशा लहान आकारातील गणेशमूर्तीना पसंती दिली जात आह़े