शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन उच्च शिक्षण-पर्याप्त पर्याय नसून पूरक प्रणाली मानली जावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

साधारणत: इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. उच्च शिक्षणाची व्याप्ती प्रचंड आहे. त्याच्या सीमा ...

साधारणत: इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. उच्च शिक्षणाची व्याप्ती प्रचंड आहे. त्याच्या सीमा विश्वव्यापी आहेत. आपल्या देशात मुख्यत्वेकरून समाजविज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माण, कला-ललितकला, अशा विविधतापूर्ण शिक्षण- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणाऱ्या शासकीय, निमशासकीय किंवा स्वायत्त संस्था आहेत.

उच्च शिक्षण घेणारे आणि घेऊ पाहणारे याना सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. परंतु ऑनलाइन उच्च शिक्षणाचे काही अल्पकालीन फायदे जरी वाटत असले तरीही प्रणाली दोषरहीत समजली जाते.

१) मन एकाग्र होत नाही - आभासी शिक्षण प्रणालीही पूर्णत: संगणक, मोबाइल किंवा दूरदर्शन स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असते. वास्तव्यासाठी प्रत्येकाला घर महत्त्वाचे आहे. घराची कधीही शाळा, महाविद्यालय होऊ शकत नाही. कारण कोणताही शैक्षणिक परिसर हा नैसर्गिक वातावरण डोळ्यासमोर ठेवून मानवाच्या कल्पकतेमधून निर्माण होत असतो. असा परिसर सदैव शाश्वत, बोलका आणि मनाला उभारी देणारा ठरलेला आहे आणि ठरत राहील.

प्रशस्तवर्ग खोल्या, ग्रंथालये, प्रयोगशाळा, जिमखाना, क्रीडांगणे, उद्याने, उपहारगृहे, विद्यार्थी-शिक्षक संवाद, मित्र-मैत्रिणींचा परिचय, आपलेपणाची भावना, समायोजन इ.जीवन मूल्यांशी संबंधित अनुभव पारंपरिक आणि सजीव प्रणालीजन्य शिक्षणातूनच शक्य आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांचे मन एकाग्र करण्यामध्ये अपुरी पडत आहे. कारण ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना घरी राहूनच घ्यावे लागत आहेत. विद्यार्थ्यांची जडण-घडण ही साधारणपणे तीन संस्कारपीठांमधून होते. पहिले संस्कारपीठ कुटुंब, दुसरे संस्कारपीठ शाळा आणि तिसरे संस्कारपीठ समाज असतो. घराची कधीच शाळा / महाविद्यालय होऊ शकत नाही. कारण घरात एकाच वेळी अनेक पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य राहतात.

पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये समवयस्क, समविचारी, भविष्याला कलाटणी देणारे, सांस्कृतिक देवाण-घेवाण करणारे, विविध प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी असणारे अनेक मित्र, मैत्रिणी आणि परिचयातील समूह एकत्र येतो. जवळपास सर्वांच्या गरजा, ध्येय, वाटचाल आणि मानसिकता समान असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान आणि समाजमन सहज ओळखता येते. त्यांच्यातील नैराश्य, वैफल्यता, नकारात्मकता आणि अस्थिर मनाची घालमेल मित्र, मैत्रिणी, शिक्षक किंवा विश्वासू सहकाऱ्यांकडे व्यक्त करून अशा अंतर्मनातील समस्यांवर हमखास उपाय सापडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकाकीपणा दूर हाेऊन मन एकाग्र होऊन ते नियंत्रणात राहू शकेल.

२) नैसर्गिक हालचालींवर निर्बंध :- ऑनलाइन उच्च शिक्षण हे १०० टक्के तंत्रज्ञानाशी आणि उपकरणांशी निगडित आहे, अशी उपकरणे मुळातच स्मार्ट समजली जातात. परंतु त्यांना हाताळणारे सर्वच कुशल आणि स्मार्ट असतीलच असे नाही. या प्रणालीचा अनिवार्य आणि अनिर्बंध वापरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धीक, मानसिक वाढीवर आणि हालचालींवर अनेक निर्बंध येत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून सांगितले जाते की, आभासी शिक्षण प्रणालीमध्ये दृष्य / श्राव्य माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वभावामध्ये ताठरपणा येऊन ते एकांतात राहणे फायद्याचे समजू लागले आहेत. त्यांच्या नैसर्गिक आणि जीवनाेपयोगी हालचाली जशा की, पायी फिरे, सायकल चालविणे, मैदानी खेळ खेळणे, प्रवास करणे, मित्र-मैत्रिणींकडे जाणे, ग्रंथालयात जाणे आदी हालचाली कुंठित होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होण्याचा धोका संभवू शकतो.

शरीराला आणि मनाला चालना देणाऱ्या हालचालींवर अनेक निर्बंध आल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनींमध्ये स्नायूंची ताठरता, स्थूलपणा, दृष्टिदोष, श्रवण दोष, शिघ्रकोपी स्वभाव, निद्रानाश, ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन जुगार, प्रतिबंधित दृष्यांसारखे कार्यक्रम बघणे, सायबर गुन्हेगारीकडे वळणे इ.अपप्रवृत्ती काही ठिकाणी अनुभवास येत आहेत.

ऑनलाइन उच्च शिक्षण प्रणालीमध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आभासी संवाद होतो. विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्यात पिढीचे अंतर असते. बहुसंख्य शिक्षक १९९० आणि २००० च्या दशकापूर्वीचे गुणवत्ता आणि पात्रताधारक आहेत. ज्ञानप्रधान व्यवस्थेत त्यांची निर्मिती झालेली आहे. विद्यमान तंत्रज्ञानाबाबत आणि ऑनलाइन शिक्षणाबाबत बहुसंख्य शिक्षकांना अनिश्चितते सोबतच उत्सुकता होती. जरी विविध कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग, अभ्यास मंडळाचे मार्गदर्शन, डिजिटल माहितीचे स्त्रोत इत्यादीच्या माध्यमातून ऑनलाइन अध्यापन प्रणाली वापरास प्रारंभ झालेला असला तरी बहुसंख्य शिक्षकांना, संशोधकांना आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा, सुप्त विचार शक्तीचा, संकलित ज्ञानाचा शिस्तीचा आणि शिष्टाचाराचा प्रभावीपणे ठसा उमटविता आला नाही.

कारण भावनिकता आणि संवेदनशीलता हे दोन संस्कार मानवासाठी वरदान ठरले आहेत. समस्त शिक्षकांमध्ये अनेक मूल्यांचा ठेवा असतो. शिक्षकांमधील विद्यार्थ्यांप्रती भावनिकता आणि संवेदनशीलता हे संस्कार अंतर्मन एकरूप हाेण्यासाठी मोलाचे ठरले आहेत. आणि ठरणार आहेत. परंतु ऑनलाइन प्रणालीमध्ये ह्या प्रकारचे संस्कार आभासी ठरत आहेत. कारण असे संस्कार आणि मूल्य कधीही फॉरवर्ड करता येत नाहीत.

समारोप :- ऑनलाइन उच्च शिक्षणासाठी सद्य:स्थितीतला पर्याय हा कायमस्वरूपी कदापि पर्याप्त ठरणारा नाही. कारण आपली जडण घडण या तंत्रज्ञानाधिष्ठीत प्रणालीतून अजिबात झालेली नाही आणि होणारदेखील नाही. जर शिक्षणाची उपयुक्तता आणि गुणवत्ता अधिक सुदृढ करावयाची असेल, स्वावलंबन, रोजगाराभिमुखता आणि स्वयंपूर्णता हे व्रत आपल्याला स्वीकारायचे असेल तर ऑनलाइन उच्च शिक्षण प्रणालीचा कार्यक्षमपणे पूरक यंत्रणामधून आपण वापर करू शकतो.

कारण आज ऑनलाइन कामकाजामुळे बँकिंग, खरेदी-विक्री व्यवहार, व्यापार, शेअर बाजार आदी व्यवहार सुकर झालेले आहेत आणि त्यांच्यात पारदर्शीपणादेखील येऊ लागला आहे. म्हणूनच पारंपरिक शिक्षणप्रणाली अबाधित ठेवण्यासाठी आणि अधिक बळकट व रचनात्मक करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा पर्याप्त पर्याय म्हणून नव्हे तर शत-प्रतिशत पूरक म्हणून तिचा स्वीकार व्हावा एवढीच अपेक्षा आहे.

- प्राचार्य, डॉ.डी.एस. पाटील, महिला महाविद्यालय, नंदुरबार