श्रावणातील पावसाचे दिवस संपले असून, ज्या महिन्यात पावसाचे सातत्य हवे त्या महिन्यात कडाक्याचे ऊन चटका देत आहे. पावसाळ्याचा खरा कालखंड ८० टक्के संपला आहे. या तीन महिन्यात दमदार पाऊसच नाही आला. तो जेमतेम पेरण्या होऊन पिके जगवण्यासाठी दमदार पाऊस नसल्याने पिकाची स्थितीही नाजूकच आहे. त्यातच जोरदार पाऊस नसल्याने नदी-नाले आजही काेरड्या स्थितीत आहेत. परिणामी परिसरातील बहुतेक विहिरींना पुरेसा पाणीसाठा नाही. काही १० ते १५ वाफे भरीत आहेत. काही दिवसातून एक ते दीड तासापर्यंत विहिरी भरणा करीत आहेत. एक-दोन, ओढा पाऊस येवून विहिरींना पाणी येईल या आशेने तयार असणाऱ्या कांद्याच्या रोपांची लागवड केली गेली. अनेकांची रोपे लागवडीवर येवून वाया जात आहेत. एकीकडे विहिरीत पाणी नाही तर दुसरीकडे वरून राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कांदा लागवड केली पण विहिरीत पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST