नंदुरबार : रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना त्यावरून जाऊ द्यावी, असे सांगितले असता त्याचा राग येऊन तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना खामगाव, ता.नंदुरबार येथे घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्या भागातून शंभू राजन भिल हा जात होता. रस्त्याने जात असतांना त्याला राहुल सुनील भिल, दीपक सुनील भिल व विशाल नामक युवकाने त्याला अडवून वाद घातला. वादातून तिघांनी लाकडी दांडक्याने तसेच हाताबुक्क्याने जबर मारहाण केली. याशिवाय दगडाने देखील मारहाण केली. याबाबत शंभू राजन भिल यांच्या फिर्यादीवरून राहुल, दीपक व विशाल यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक मुकेश ठाकरे करीत आहे.