शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून केला मुलीच्या वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून एकतर्फी प्रेमातून मुलीच्या मित्रानेच मुलीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खांडबारा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून एकतर्फी प्रेमातून मुलीच्या मित्रानेच मुलीच्या वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. संशयीतास नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसातच खूनाचा छडा लावण्यात एलसीबीला यश आले आहे.देवदत्त उदेसिंग (२७) रा. कादरवाडी, कासगंज (उत्तर प्रदेश) हल्ली मु.नरहरीनगर, पाथर्डी फाटा, नाशिक असे संशयीताचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.खांडबारा येथील शेतकरी भटूलाल काशिनाथ परदेशी यांचा त्यांच्या शेतातील घरात दगडाने ठेचून खून झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी उघड झाली होती. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी परदेशी यांच्या मुलीला पहाण्यासाठी स्थळ येणार होते. विसरवाडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेतर्फे करण्यात येत होता.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नवले यांचे पथक नियुक्त केले. नवले यांनी आपल्या अनुभवाच्या कौशल्यावर तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी काहीही पुरावा मिळाला नाही. मयताच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी होत त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही माहिती हाती लागली नाही. शेताच्या आजूबाजूच्या रखवालदारांनाही विचारणा केली, परंतु उपयोग झाला नाही. याच दरम्यान त्यांना परदेशी यांच्या मुलीच्या मित्राबाबत कळाले. मुलगी ज्या कंपनीत काम करीत होती त्याच कंपनीत संशयीत देवदत्त देखील काम करीत होता. दोघांची मैत्री असल्यामुळे तो खांडबारा येथे मुलीच्या घरी येत होता. तीन ते चार दिवस तो मुक्कामी राहत होता. ही कडी लक्षात घेवून देवदत्त याच्यावर किशोर नवले यांनी फोकस केला. याच दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि क्ल्यू मिळाला.देवदत्त हा नाशिक येथे सध्या वास्तव्यास आहे. परंतु कुठल्या कंपनीत आहे, कुठे राहतो याबाबत काहीही माहिती नव्हती. अखेर माहिती काढत पथक नाशिक येथे आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या कंपनीत कामास असल्याची माहिती मिळाली. त्याच परिसरात तो भाड्याच्या घरात मित्रांसोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले. पुर्ण माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.नंदुरबार येथे आणले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत परदेशी यांची मुलगी व संशयीत यांची ओळख पुण्यातील एका कंपनीत काम करतांना झाली होती. तो मुलीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. इकडे मुलीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. स्थळ येवू लागले, ही बाब देवदत्त यास समजल्यावर तो बेचैन झाला. २३ रोजी तो बसने नाशिक येथून नंदुरबार व नंदुरबारहून खांडबारा येथे गेला.रात्री शेतात त्याने भटूलाल परदेशी यांना सांगू लागला. परंतु परदेशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी त्याने परदेशी यांच्याशी झटापट केली. रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. रात्री रेल्वेने तो खांडबाराहून नंदुरबारला आला व तेथून तो नाशिकला बसने गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, विसरवाडीचे सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, उपनिरिक्षक योगेश राऊत, एलसीबीचे हवालदार महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, जितेंद्र तोरवणे, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांनी केली.