शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:15 IST

जिल्ह्याची स्थिती : पाच वर्षात गमावले ९०१ जणांनी प्राण, ७७४ प्राणांकित अपघात

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंतच्या साधारणत: पाच वर्षांच्या कालावाधीत एकूण झालेल्या ७७४ प्राणांकीत (फेटल) अपघातात एकूण ९०१ जणांचा बळी गेला आहे़ तर जिल्ह्यातील एकूण अपघातांची संख्या पाच वर्षात २ हजार ८०३ वर जाऊन पोहचली आहे़ दर तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघातातील जखमी असल्याची माहिती आहे़गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे़ यात, किरकोळ अपघातांसह प्राणांकीत अपघातांचाही मोेठ्या प्रमाणात समावेश आहे़ वारंवार अपघात होत असल्याने याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरणार आहे़ वाढते अपघात आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़२०१४ साली जिल्ह्यात एकूण ६०५ अपघातांची नोंद करण्यात आली़ यात १२८ प्राणांकित अपघतांचा समावेश असून यात एकूण १५२ जणांना मृत्यू झाला़ २०१५ साली ५८७ अपघात झालेत़ यात १४३ प्राणांकित अपघातात १७५ जणांना मृत्यू झाला़ २०१६ या वर्षी ६२३ अपघात झालेत़ यात एकूण १५४ प्राणांकित अपघाताचा समावेश असून यात, १७९ जणांचा बळी गेला़२०१७ साली ५२७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यात १२८ प्राणांकित अपघात आहेत़ त्यात, १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला़ २०१८ या वर्षी एकूण ३३७ अपघातात सर्वाधिक म्हणजे १६२ प्राणांकित अपघात झाले़ यात १७७ जणांना मृत्यू झाला़ तर एप्रिल २०१९ पर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ अपघात झाले असून यात ५९ प्राणांकित अपघतांचा समावेश आहे़ तर ७२ जणांना यात बळी गेला आहे़ रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झालेली दिसून येत आहे़ शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आहे़ याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आहे़त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की.. अशीच दिसून येत आहे़ दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आहे़ जिल्ह्यातील पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आहे़ त्यामुळे अशा पुलांचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे़ याबाबत आॅडीट होणे अपेक्षीत आहे़