शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाची गावठी दारू व साधने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 13:02 IST

मोहिम : गुन्हे शाखेची जिल्ह्यातील विविध भागात कारवाई

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 30-  जिल्ह्यात सण उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध दारूविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आह़े याअंतर्गत मंगळवारी पथकाने जिल्ह्यात कारवाई करत एक लाख आठ हजाराची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला़ पथकाने शहादा तालुक्यातील फत्तेपूर गावात दोन ठिकाणी छापा टाकून 59 हजार 400 व 34 हजार 200 रूपये किमतीचे एकूण 50 लीटर क्षमता असलेले मातीचे 38 माठ, 200 लीटर क्षमतेचे प्लास्टिकचे 12 ड्रम त्यात एकूण चार हजर 300 लीटर गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी लागणारा महूफुलांचा वॉश, मोटारीचे सात टय़ुब, 370 लीटर दारू असा 93 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याठिकाणाहून  राजू दिनू ठाकरे व विनोद जामा ठाकरे या दोघांना अटक करण्यात येऊन म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिवदे, विनोद जाधव, जगदीश पवार, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांनी केली़ नंदुरबार तालुक्यातही कारवाई नंदुरबार शहरालगत पातोंडा गावात व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गिरीविहार परिसरात तीन ठिकाणी कारवाई करण्यात येऊन 14 हजार 400 रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली़ याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात दोन जण  व उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पाच गुन्ह्यांमध्ये एकूण एक लाख 8 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला केला़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आह़े