शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाका-नंदुरबार रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एक ठार दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ समोरुन येणा:या पीकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ समोरुन येणा:या पीकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने 1 ठार तर दोघे गंभीर जखमी झाल़े 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ विजेंद्र सत्कार मोरे (28) रा़ सुंदर्दे हा युवक 16 रोजी एमएच 04 एफडी 6775 या पीक अप वाहनाने नंदुरबार शहराकडे येत असताना पथराई फाटय़ाजवळ आरजे 06 जीसी 2573 या कंटेनरने पिकअपला समोरुन धडक दिली़ धडकेत पीकअप चालक विजेंद्र मोरे हा जागीच ठार झाला़ तर सोबत असलेले रोहित शांतीलाल वसावे आणि सुनिल उर्फ चुनीलाल वसावे रा़ नारायणपूर हे दोघेही गंभीर जखमी झाल़े अपघातानंतर कंटेनरचालक नानेराम गंगाराम गुजर रा़ रघुनाथपुरा, राजस्थान हा घटनास्थळावरुन पसार झाला़ घटनेनंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी भेट देत माहिती जाणून घेतली होती़ अपघातानंतर पोलीसांनी चौकशी करुन दोषी कंटेनर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली़ याबाबत उपनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास सोमनाथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चालक नानेराम गुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल सजन वाघ करत आहेत़ अपघातात जखमी झालेल्या दोघांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आह़े राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद असल्याने गुजरात राज्याकडे जाणारी व तेथून येणारी वाहने नंदुरबार मार्गाने वळवण्यात आली आह़े विसरवाडीकडून येणारी वाहने नंदुरबार मार्गाने वाका चारस्त्याकडे जात आहेत़ यातून मार्गावर वाहनांची संख्या वाढून अपघातातही वाढ झाली आह़े खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वेग अधिक आह़े