लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा- शहादा रस्त्यावर हॉटेल सारंगच्यापुढे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कारने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातातील जखमी मोटारसायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलीस सूत्रानुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहाद्याकडे जाणा:या कारने (क्रमांक एम.एच.39 जे- 8491) दोंडाईचाकडे जाणा:या मोटारसायकलला (क्रमांक एम.एच.18 एएल- 9983) धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील रमेश लोटन पाटील (55) व भीमराव गरबड पाटील (55) (दोन्ही रा.वरसूस, ता.शिंदखेडा) हे जखमी झाले. जखमींना सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रमेश पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत कार चालक एकनाथ सुभाष जाधव (रा.मंदाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिसांनी कारचालकास अटक केली असून तपास गणेश न्हायदे हे करीत आहेत.
कार-मोटारसायकल अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:25 IST