शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी पळवून नेण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलगी पळवून नेल्यानंतर त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलगी पळवून नेल्यानंतर त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना साव:यादिगर, ता.धडगाव येथे घडली. दुस:या गटानेही फिर्याद दिली आहे. गावात तणावपुर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला  आहे. अकिल मोती पावरा (27) रा.सिंधीदिगर, ता.धडगाव असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार साव:या दिगर येथील दिलीप राडय़ा पावरा याने मोटला मोती पावरा यांची मुलगी पळवून नेली होती. त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्यासाठी बैठक बसविली. परंतु त्यात समझोता न होता वाद झाल्याने मारहाण झाली. सिंधी दिगर येथील अकिल मोती पावरा (27) रा.सिंधीदिगर याच्यावर जमावाने हल्ला चढविला. डोक्यावर लोखंडी पाईपने वार केला. त्यात त्यांला वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर मोटला मोती पावरा, अरमिल मोटला पावरा, रा.भमानी, ता.धडगाव हे जखमी झाले. जमावाने दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली. लाठय़ा, काठय़ांचाही मारहाणीत वापर करण्यात आला. याबाबत मोटला मोती पावरा यांनी फिर्याद दिल्याने आपसिंग भारता पावरा, राडय़ा भारता पावरा, सुकल्या भारता पावरा, संदीप राडय़ा पावरा, दिलीप राडय़ा पावरा सर्व रा.साव:यादिगर, ता.धडगाव यांच्याविरुद्ध खून आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक निळे करीत आहे. दुसरी फिर्याद शिवल्या मोद्या पावरा, रा.साव:या दिगर यांनी फिर्याद दिली. झगडा भरण्यावरून वाद होऊन जमावाने हल्ला केल्याचे म्हटले आहे.  मोटला मोती पावरा, अरमिल मोटला पावरा दोन्ही रा.भमाने, अकिल मोती पावरा, रा.सिंधीदिगर व इतर तीन ते चार जणांनी घरात घुसून संसार उपयोगी सामानाची नासधूस केली. लाकडी दांडक्याने मारून जखमी केले.  या मारहाणीत राडय़ा भारता पावरा, जहांगिर इताम पावरा हे जखमी झाले.   तपास फौजदार सोनवणे करीत    आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे , सहायक पोलीस निरिक्षक निळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गावात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. संशयीतांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक पाठविले आहे.