लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साक्री-नंदुरबार रस्त्यावर पीकअपने मोटारसायकलला कट मारल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.मैंदाणे, ता़साक्री येथील कन्हैयालाल सखाराम पवार, कन्हैयालाल बापू पवार व राकेश काळू पवार हे दुचाकीने मैंदाणे गावाकडे जात असताना जिल्हा कारागृहासमोर एमएच 41 ए़यू 0249 या पीकअप वाहनाने त्यांना कट मारला यात तिघे जण रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाल़े यात कन्हैय्यालाल सखाराम पवार यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ याबाबत तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पीकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल आह़े
कारागृहासमोर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:33 IST