शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दूषित पाण्याचा एक घोट अन गाव सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:43 PM

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  1 हजार 120 कुटूंबे राहणा:या सहा हजार लोकवस्तीच्या कहाटूळ गावातील प्रत्येक ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  1 हजार 120 कुटूंबे राहणा:या सहा हजार लोकवस्तीच्या कहाटूळ गावातील प्रत्येक घरात डायारियाची लागण झालेला किमान एक रूग्ण असल्याचे समोर येत आह़े  पाणीपुरवठय़ाच्या जीर्ण पाईपातून पिवळ्याशार पाण्याचा घोट घेतल्यापासून गाव सलाईनवर असून यासाठी आता प्रशासन धावपळ करत असले तरी ही साथ पसरण्यासाठी कारणीभूत असलेली पाणीटंचाई मात्र अद्यापही कायम आह़ेशहादा शहरापासून पूव्रेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावरचे कहाटूळ गाव दोन दिवसांपासून डायरियाच्या अचानक उद्भवलेल्या साथीशी झगडत आहेत़ यात 10 वर्षीय बालक  बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजनांची ठिगळं लावून हा प्रकार निस्तरण्याचा प्रयत्न केला असला तरीही साथरोग पूर्णपणे आटोक्यात आलेला नसल्याचे आरोग्य केंद्रातील स्थितीवरुन स्पष्ट होत आह़े आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल केल्यानंतर साधा वीज पुरवठाही नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाल़े दरम्यान येथून मंगळवारी बानूबाई पावरा (63), रूख्माबाई कोळी (73) आणि चार वर्षीय विशाल पाडवी या बालकास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़  गावात दारिद्रय़रेषेखालील 404 कुटूंबे आहेत त्यातील किमान 100 कुटूंबे साथरोगाने बाधित आहेत़ यामुळे गोरगरीबांच्या वसाहतीत शुकशुकाट आह़े अनेकांकडे दोन दिवसात चूलच पेटली नसल्याचे सांगण्यात आल़े संसदरत्न खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दत्तक घेतलेल्या या गावात भेट दिली असता, येथील भिषण पाणीटंचाईच डायरियाच्या साथीचे प्रमुख कारण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल़े तापीकाठापासून 10 किलोमीटर अंतरावरील कहाटूळ गावात पाणीपुरवठय़ासाठी 70 वर्षापूर्वी पायविहिरीची निर्मिती करण्यात आली होती़ याच विहिरीचे वेळावेळी पुनरुज्जीवन करून गावाला पाणी पुरवठा सुरु होता़ परंतू ही योजना कोरडी झाल्यानंतर ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वी भोंगरा शिवारातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे आणून ते पायविहिरीत सोडले होत़े येथून पुन्हा पाईपलाईनद्वारे हे पाणी घराघरात पोहोचले होत़े हा पाणी पुरवठा करण्यासाठी 1984 पासूनची मुख्य पाईपलाईन वापरात आणली गेली़ वर्षानूवर्षे जीर्ण झालेल्या या पाईपलाईनवर गटारी बांधल्याने त्यातील पाणी पाईपांमध्ये जाऊन गावाला दूषित पाणी पुरवठा सुरु होता़ वर्षभरापासून सुरु असलेल्या दूषित पाणीपुरवठय़ाचा परिणाम डायरियाच्या रुपानेसमोर आला आह़े साथ पसरल्यानंतर जुलाब आणि उलटय़ांनी बेजार झालेल्या 56 रूग्णांना रविवारी रात्रीपासून आरोग्य केंद्रात दाखल केले गेले होत़े शनिवारी गावात नळाद्वारे सोडलेले पिवळेशार पाणी प्यायल्याने करण भिल या 11 वर्षीय बालकाचा केवळ सात तासात करूण अंत झाल्यानंतर या घटनेचे गांभिर्य समजून घेत अधिका:यांनी येथे धाव घेतली़ तूूर्तास याठिकाणी सहा वैद्यकीय अधिका:यांचे पथक तैनात आह़े मंगळवारी 21 जणांची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आह़े तर उर्वरित 35 रूग्णांवर येथेच उपचार सुरु आहेत़ वीज नसलेल्या आरोग्य केंद्रात सोय होत नसल्याने नागरिकांनीच घरुन आणलेल्या खाटांवर रूग्णाला टाकून देत आवारातील झाडाला बांधलेल्या सलाईन लावून साथरोग दूर सारण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आह़े