शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लहान बालकाला दुचाकीवर बसवून त्याचा मोबाईल घेत एकाने काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुर्नवसन येथे शेतातील घरात ऑनलाईन अभ्यास करणार्या बालक मोबाईल देत नसल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुर्नवसन येथे शेतातील घरात ऑनलाईन अभ्यास करणार्या बालक मोबाईल देत नसल्याने त्याला दुचाकीवर बसवून नेत त्याचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आहे. रोझवा येथील संतानसिंग जहांगीर पावरा हे पत्नी सुनीता, तीन मुली व आठ वर्षीय मुलगा धीरज यांच्यासोबत शेतातीत मुक्कामी होते. सोमवारी पावरा दाम्पत्य शेतात तर मुले शेतातील घरात अभ्यास करत होती. मुलगा धीरज हा इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असल्याने ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल घेतला आहे. दरम्यान अभ्यास सुरू असताना शेताजवळ दुचाकी लावत एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी येवून मुलाकडून मोबाईल मागू लागला. धीरज याने तो न दिल्याने संशयिताने शक्कल लढवून तळोद्याची सफर घडवून आणतो म्हणून दुचाकीवर बसवत घेऊन गेला. अर्ध्या रस्त्यात धीरज याला उतरवून देत त्याचा मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. घटनेनंतर काही वेळात रडणार्या बालकास गावातीलच जितेंद्र पावरा याने पुन्हा घरी सोडल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. घटनेनंतर संतानसिंग पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेमुळे परीसरातील नागरीकांनी या भागात संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.