शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात दीड क्विंटल प्लास्टीक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : प्लास्टीक बंदीप्रकरणी तळोदा पालिकेने मंगळवारी शहरातील तीन दुकानांवर अचानक धाडी टाकून त्यांच्याकडून दीड क्विंटल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : प्लास्टीक बंदीप्रकरणी तळोदा पालिकेने मंगळवारी शहरातील तीन दुकानांवर अचानक धाडी टाकून त्यांच्याकडून दीड क्विंटल वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्याची कारवाई केली. प्रशासनाने पुन्हा अचानक धाड टाकल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, पालिकेने यात सातत्य राखण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी केली आहे.तळोदा शहरात प्लास्टीक बंदीबाबत पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय स्वतंत्र पथकही स्थापन करून या पथकाच्या माध्यमातून किरकोळ विक्रेते व भाजीपाला व्यावसायिकांना कॅरीबॅगा न वापरण्याच्या सूचनेबरोबर कडक समज देण्यात येत आहे. असे असताना शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर केला जात आहे. साहजिकच मुळावर घाव घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे यांनी प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, सचिन पाटील, विशाल माळी, सनी सूर्यवंशी, डिगंबर माळी, अश्विन परदेशी, नारायण माळी, मोतीलाल गोजरे, सुरेंद्र वळवी, रघुनाथ अहिरे यांच्यासह शहरातील भन्साली प्लाझा येथील के.जी. प्रोव्हीजन, मयूर स्वीट व ओम गुरुदेव अशा तीन व्यापारी प्रतिष्ठानांवर मंगळवारी दुपारी अचानक धाडी टाकल्या. या धाडीत संबंधित दुकानदारांकडून साधारण दीड क्विंटल वजनाच्या प्लॉस्टीक कॅरीबॅग आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला असून संबंधित दुकानदारांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील दोन व्यावसायिकांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली होती. वास्तविक प्लास्टीकच्या कॅरीबॅगा न ठेवण्याबाबत पालिकेकडून कडक तंबी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तशा आशयाची लेखीही देण्यात आली असताना मुजोर व्यावसायिक सर्रास बेकायदेशीर बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तू विक्री करतात. त्यामुळे अशी कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, कारवाईबाबत पालिका प्रशासनाने सातत्य राखणे आवश्यक आहे. तशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यासाठी पुरवठादारांनाच लक्ष्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.