शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

अबब़़ शासकीय कार्यालयांकडे पालिकेचे करपोटी दीड कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची करवसुली नगण्य स्वरूपात होत आहे़ यामुळे तीन कोटी रुपयांचा फटका पालिकेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची करवसुली नगण्य स्वरूपात होत आहे़ यामुळे तीन कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे़ यात सर्वाधिक दीड कोटी रूपयांची थकबाकी ही शासकीय कार्यालयांची असून तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़पालिका हद्दीत ३२ हजार ३९६ मालमत्ताधारक आहेत़ २०१९-२०२० आर्थिक वर्षात मालमत्ताधारकांकडून केवळ ९ कोटी ९६ लाख ७७ हजार रूपयांची वसुली आतापर्यंत होवू शकली आहे़ थकीत रकमेत दीड कोटी रूपयांचा वाटा हा शासकीय कार्यालयांचा आहे़ यात परिवहन महामंडळाकडे २२ लाख ३७ हजार, जिल्हाधिकारी कार्यालय २५ लाख ८४ हजार, पोलीस अधिक्षक कार्यालय २१ लाख ३१ हजार, जिल्हा क्रीडा संकुल १५ लाख ७५ हजार तर शासकीय दूध डेअरीकडे ११ लाख रूपयांचा कर प्रलंबित आहे़ ही आकडेवारी २०१९-२०२० या वर्षातील आहे़ या कार्यालयांच्या प्रशासनाने रक्कम भरावी असे पालिकेचे म्हणणे आहे़ परंतु कोरोनाच्या कामात व्यस्त असलेल्या त्या-त्या कार्यालयांच्या प्रशासनाने अद्याप घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या कराची रक्कम दिलेली नाही़ पालिकेकडून सातत्याने यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे़पालिकेच्या अखत्यारितएकूण १३ प्रभागात शासकीय कार्यालयांच्या एकूण ५२ मालमत्ता आहेत़ मुख्यालयांसह तालुका स्तरीय कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस चौकी, विज कंपनीची कार्यालये यांचा समावेश त्यात आहे़ आजअखेरीस सर्व ५२ आस्थापनांकडे १ कोटी ४८ लाख ३४ हजार ८०२ रुपयांचा कर शिल्लक आहे़ ही आहेत काही प्रमुख कार्यालय़़: थकबाकीदार शासकीय कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी पर्यवेक्षक तालुका बीज गुणन केंद्र धुळे रोड, सरकारी पोलीस चौकी मंगल गेट, विज मंडळ सबस्टेशन, राज्य परिवहन महामंडळ, शहर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक टाऊन व तालुका कार्यालय, सब रजिस्ट्रार यांचे कार्यालय, सब ट्रेजरी आॅफिस, तहसीलदार कार्यालय (जुने), तहसील कार्यालय (सबजेल), पंचायत समिती, जिल्हा परिषद एज्युकेशन सोसायटी कार्यालय, म्यु़धर्मशाळा दारूबंदी कार्यालय, राज्य विद्युत मंडळ कार्यालय (बसस्थानकाजवळ), कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद मार्केट यार्ड, बीएसएनएल आॅफिस व निवासस्थान, डिव्हीजनल मॅनेजर धुळे वनविभाग गिरीविहार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग पटेलवाडी, जुनी पंचायत समिती, फॉरेस्ट डेपो, पोलीस सब इन्स्पेक्टर क्वार्टर टाऊन व निवास स्थान नळवा रोड, डीवायएसपी बंगला, नवी आणि जुनी पोलीस लाईन नळवा रोड, पोलीस व्यायाम शाळा, गटसाधन केंद्र, उपअभियंता जिल्हा परिषद घोडे बांधणी, पत्रा पोलीस चौकी, जळका बाजार पोलीस चौकी आदींचा समावेश आहे़ ४सर्वाधिक रक्कम थकीत असलेली शासकीय कार्यालये प्रभाग १३ मध्ये आहेत़ यात पीडब्ल्यूडी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय निवास्थान, धुळे मध्यम प्रकल्प, शासकीय दूध डेअरी व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन यांचा समावेश आहे़ नगरपालिका प्रशासन सातत्याने थकबाकीदार शासकीय कार्यालयांकडे सपंर्क करत आहे़ इंदिरा गांधी संकुलातील विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे ३१ लाख रूपयांचे भाडेही थकीत आहे़ वसूली झाल्यास कराच्या रकमेतून पालिकेच्या विकास कामांना चालना मिळून नंदुरबार नगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सांगितले.