शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:52 IST

तळोदा : तालुक्यातील कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे या कलावंतांपुढे मोठय़ा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित यंत्रणेने त्यांच्या बँक खाते क्रमांकाची चूक पुढे केली असली तरी यात तातडीने दुरुस्ती करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून दरमहा पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.राज्यातील वृद्ध कलावंतांना कला व सांस्कृतिक विभागामार्फत ...

तळोदा : तालुक्यातील कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे या कलावंतांपुढे मोठय़ा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित यंत्रणेने त्यांच्या बँक खाते क्रमांकाची चूक पुढे केली असली तरी यात तातडीने दुरुस्ती करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून दरमहा पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.राज्यातील वृद्ध कलावंतांना कला व सांस्कृतिक विभागामार्फत मानधन दिले जात असते. दरमहा साधारण दीड हजार रुपये मानधन दिले जाते. तळोदा तालुक्यातदेखील अशा 105 वृद्ध कलावंतांना मानधन देण्यात येते. परंतु या कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्काटली आहे. आर्थिक व्यवहारच ठप्प झाल्यामुळे उधार-उसनवारीची पतही संपली आहे. परिणामी           त्यांच्या कुटुंबावर उपासमरीची वेळ आल्याची व्यथाही  त्यांनी बोलून दाखवली आहे. आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत तपास करण्यासाठी हे कलावंत पंचायत समितीकडे सातत्याने चकरा मारत आहेत. तेथे संबंधित कर्मचारी भेटत नसल्यामुळे त्यांना निराश होवून घरी यावे           लागत असल्याचे ते सांगतात. बहुसंख्य कलावंत हे खेडेगावातील असल्यामुळे चौकशीसाठी त्यांचा         वेळ तर जातोच शिवाय              आर्थिक झळदेखील सोसवी लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. नंदुरबार समाज कल्याण विभागाकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारले असता आता कला व सांस्कृतिक विभागामार्फत थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात असते. त्यामुळे बँकेमार्फतच त्यांना पैसे मिळतात. तळोद्यातील अनेक कलावंतांचे बँक खाते नंबर चुकीचे असल्यामुळे अशांचे मानधन रखडल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी याविषयी पंचायत समितीशी समनवय ठेवून लाभार्थीकडून त्यांचे बँक खाते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. क्षुल्लक कारणासाठी तब्बल दहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले असल्याने या कलावंतांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  काहींनी तर तब्बल दोन वर्षापासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.वास्तविक यातील काही अंध कलावंत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या मानधनावरच अवलंबून असतो. अशांची अतिशय बिकट अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून तातडीने त्यांचे रखडलेले अनुदान मिळवून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.