लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ओसर्ली येथे आदिवासी वस्तीतील मुलांच्या को:या कागदावर सह्या घेतल्याचा जाब विचारणा:यास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरुवारी सकाळी 9 वाजता ओसर्ली गावात ही घटना घडली़ हितेंद्र दरबारसिंग गिरासे, राजेंद्र जयसिंग गिरासे, गोकुळसिंग सुपडूसिंग गिरासे, मच्छिंद्र प्रतापसिंग गिरासे, मुकेश दरबारसिंग गिरासे, राजपाल राजेंद्र गिरासे सर्व रा़ ओसर्ली यांनी आदिवासी वस्तीतील काही मुलांच्या को:या कागदावर सह्या घेतल्याची माहिती आह़े ही माहिती मिळाल्यानंतर ओसर्ली ग्रामपंचायतीत शिपाई या पदावर कार्यरत असलेले युवराज हाऊसिंग सोनवणे यांनी संशयितांना याबाबत माहिती विचारली होती़ याचा राग आल्याने हितेंद्र, राजेंद्र, गोकूळसिंग, मच्छिंद्र, मुकेश आणि राजपाल यांनी सोनवणे यांना गावातील चौकात थांबवून जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले होत़े दरम्यान त्यांना धक्काबुक्की करत गर्दी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ यावेळी संशयितांकडून गर्दी करुन जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने कारवाई करण्यात आली आह़े याबाबत युवराज सोनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत तसेच मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़
सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:03 IST