शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटूंबांनी घेतला वाजतगाजत जमिनीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर पुनर्वसीत कुटूंबांना 1994-95 पासून घर, प्लॉट न दिल्याने प्रकल्पग्रस्त कुटूंबे नर्मदानगरातील ओपन ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर पुनर्वसीत कुटूंबांना 1994-95 पासून घर, प्लॉट न दिल्याने प्रकल्पग्रस्त कुटूंबे नर्मदानगरातील ओपन प्लेस मध्ये राहत होते. शासनाच्या          दुर्लक्षाला कंटाळून नर्मदानगरातील प्रकल्पग्रस्त 100 कुटूंबाने वाजतगाजत गट नंबर 466 ताब्यात घेवून ताबा घेतला. ढोल वाजवत शासनवालो सून लो आज हमारे गावमे हमारा राज, कोण म्हणतं देणार नाही-घेतल्याशिवाय राहणार नाही, हम हमारा हक जानते,नहीं किसींसे भीक मांगते.. अशा घोषणा देत गावातून रॅली काढत 100 प्रकल्पबाधित दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गट नंबर 466 वर पोचले. डनेल या मुळ गावातील सिंगा वेस्ता पाडवी यांना आजतागायत वेळोवेळी मागणी करूनही घरप्लॉट दिलेला नाही त्यांनी भूमिपूजन करत, नारळ फोडून जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे उदघाटन केले.जवळपास दोन तास दोन जेसीबीने सव्र्हे नंबर 466 चे सपाटीकरण करून तिथे प्रातिनिधिक स्वरूपात एक घरप्लॉटची मोजणी करून सिंगा वेस्ता पाडवी यांना गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ताबा दिला.नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीत जवळपास 90 प्रकल्पबाधित 1994-95 पासून विना घरप्लॉट गावाच्या  ओपनप्लेस मध्ये  नाईलाजास्तव  राहत आहेत. या सर्व प्रकल्पबाधितांना नर्मदानगर गावाठाणात स्थलांतर  करून आणले आहे व घरप्लॉट मात्र कागदावर कागदी घोडे नाचवत सरदारनगर मध्ये दिले आहेत. या प्रकल्पबाधितांच्या शिफ्टिंग पासवर मूळ गावातून सोमावल गावाठाणात स्थलांतर करत असल्याचे नमूद असूनही घरप्लॉट सोमावल मध्ये दिलेले नाहीत. तसेच काही प्रकल्प बाधितांना दिलेल्या घरप्लॉट च्या ताबा पावतीवर असलेल्या  नंबरचा घरप्लॉट प्रत्यक्षात नर्मदा विकास विभागाच्या नकाशावर अस्तित्वात नाही. आंदोलनाकरिता नर्मदा बचाओ आंदोलनाच्या लतिका राजपूत,  चेतन साळवे, ओरसिंग पटले,  सियाराम पाडवी, पुन्या वसावे, किर्ता वसावे, नूरजी वसावे, कालूसिंग पाडवी, किरसिंग वसावे व इतर नर्मदानगर चे प्रकल्पबाधित व  ग्रामस्थ उपस्थित होते. नर्मदा  विकास विभागाचे उप अभियंता अविनाश माळसे, आर.आर.पाटील, राठोड आदी उपस्थित होते.   त्यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले व घरप्लॉट आम्हाला याच गावठाणात देण्यात यावे अशी लोकांनी त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सदर प्रश्नासंदर्भात वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.