शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मंत्रालयामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार - राजकुमार बडोले

By admin | Updated: January 11, 2017 23:39 IST

सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केला.

नंदुरबार : राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठीच सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत विजय चौधरी यांच्या रुपाने राज्यातील ओबीसींसाठी चांगले नेतृत्व मिळाल्याचे प्रतिपादन समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात विजय चौधरी यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विजयपथ या गौरविकेचे प्रकाशन मंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ.हीना गावीत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे, हिरालाल मगनलाल चौधरी, माजी नगराध्यक्षा इंदुताई चौधरी, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष बबन चौधरी, आमदार शिरीष चौधरी, धुळ्याच्या माजी महापौर जयo्री अहिरराव, डॉ. रवींद्र चौधरी, अरविंद कुवर, प्रकाश माळी, मनीषा चौधरी, नगरसेविका अनिता चौधरी, वैशाली विजय चौधरी उपस्थित होते.यावेळी बडोले यांनी सांगितले, अनेक वर्षा पासून ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी होती. त्यानुसार तत्कालीन शासनाने 1999 मध्ये यावर विचार केला परंतु तो निर्णय मागे राहिला. भाजप शासनाने यावर विचार करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातील 350 जातींना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.ओबीसी समाजाला चांगले व्यक्तिमत्व लाभले आहे. ते समाजाला उन्नतीकडे नेण्याचा प्रय} करत असल्याचे गौरवोद्गारही बडोले यांनी काढले. खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले, शहरात प्रस्थापित राजकारणी लोकांसमोर कोणी उभे रहात नव्हते, परंतु  आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संघर्षमयी जीवनात नेहमी विजय चौधरी उभे राहिले आहेत. भविष्यात देशात ओबीसी नेतृत्वाच्या रूपाने राष्ट्रीय अध्यक्ष बनावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.आमदार संजय कुटे यांनीही विजय चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार शिरीष चौधरी, पुरूषोत्तम काळे, o्रावण चव्हाण, नाना महाले, प्रशांत पाटील,  वैष्णवी चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.विजय चौधरी यांनी सांगितले, कार्यकर्ते हेच माङो बळ आहे. रणझुंझार समितीच्या माध्यमातून काम केले, लोकांचे प्रश्न सोडविले, प्रस्थापितांविरुद्ध लढलो. प्रामाणिक हेतू, त्याला तडीस नेण्याची धमक असेल तर कोणी पराभूत करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसींना क्रिमिलेअरची अट शिथिल करावी अथवा आठ लाख रुपयाची अट करावी, अशी मागणी विजय चौधरी यांनी केली. प्रस्ताविक रूपेश यांनी केले. सूत्रसंचालन पाटकर आणि विष्णु जोंधळे यांनी केले.      ओबीसी मोर्चा पदाधिका:यांचा राज्यस्तरीय मेळावासकाळी राज्यभरातील ओबीसी मोर्चाच्या पदाधिका:यांचा मेळावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करताना राजकुमार बडोले व आमदार संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील पदाधिका:यांना अधीक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आणखी एक राज्यस्तरीय दौरा आयोजित करण्यात येणार असून पदाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी अधीक क्रियाशिल करण्याचे आवाहन त्यांनी केले.